शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: राष्ट्रवादी सत्तेत की विरोधात, निर्णयाचे अधिकार अजितदादांना; नूतन नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:34 IST

सांगली : महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार )ने चांगली कामगिरी केली आहे. आता भाजपबरोबर महायुती म्हणून सत्तेत ...

सांगली: महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )ने चांगली कामगिरी केली आहे. आता भाजपबरोबर महायुती म्हणून सत्तेत जायचे की विरोधी बाकावर बसायचे ? याबाबतचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याचा निर्णय नूतन नगरसेवक व स्थानिक नेत्यांनी रविवारी घेतला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या निवासस्थानी नूतन नगरसेवकांचा सत्कार माजी खा. संजय पाटील, आमदार इद्रिस नायकवडी व शहर जिल्हाध्यक्ष जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर किशोर जामदार, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आझम काझी, गजानन मगदूम, अतहर नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, करण जामदार, अभिजित भोसले, नसीमा शेख आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

माजी खा. संजय पाटील यांनी सर्व कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी चांगली कामगिरी केल्यामुळे अपेक्षित यश मिळवता आले असल्याचे मत व्यक्त केले. आ. नायकवडी यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भविष्यात चांगली कामगिरी करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात, अशा सूचना दिल्या. तर शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी महापालिकेच्या सत्तेत महायुती की विरोधात म्हणून जायचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊ, असे सांगितले. याला सर्वांनी होकार दिला.

यावेळी, युवक अध्यक्ष आकाश माने, कार्याध्यक्ष जयंत जाधव, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष तोहीद शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्छी, सांगली शहर युवक अध्यक्ष तोहीद फकीर, मिरज शहर युवक अध्यक्ष अतुल भिसे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: Pawar to Decide on Power or Opposition Role

Web Summary : Newly elected NCP corporators in Sangli authorize Ajit Pawar to decide whether to join the ruling coalition with BJP or sit in opposition. Leaders emphasized public service.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार