एस. टी. कामगार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:56+5:302021-02-05T07:24:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक खोत आणि सचिवपदी नारायण सूर्यवंशी यांची ...

S. T. Ashok Khot as the divisional president of the trade union | एस. टी. कामगार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक खोत

एस. टी. कामगार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक खोत

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी अशोक खोत आणि सचिवपदी नारायण सूर्यवंशी यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडी बिनविरोध झाल्या.

नूतन कार्यकारिणी निवडीसाठी संघटनेच्या कार्यालयात सभासदांची बैठक झाली. या बैठकीमध्ये खोत, सूर्यवंशी यांची फेरनिवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय कार्याध्यक्षपदी शमू मुल्ला, विभागीय खजिनदारपदी अशोक शिरोटे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सभासदांनी केला.

खोत म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटीसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. कर्मचाऱ्यांना थकीत पगार शंभर टक्के मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. यावेळी मिरज आगाराचे अध्यक्ष उदय ठाणेकर, सचिव राजेश पाटील, सत्वशील कोळी, नितीन पाटील, शकील शेख आदी उपस्थित होते.

Web Title: S. T. Ashok Khot as the divisional president of the trade union