ओम गणेश मंडळाच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:17+5:302021-09-25T04:28:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओम गणेश सार्वजनिक गणपती व भाजपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

Response to Om Ganesh Mandal Health Checkup Camp | ओम गणेश मंडळाच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

ओम गणेश मंडळाच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओम गणेश सार्वजनिक गणपती व भाजपच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. ३५० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ५० जणांनी रक्तदान केले.

येथील चांदणी चौकात ओम गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांनी हा उपक्रम राबविला. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे उपस्थित होते. यावेळी ईसीजी व रक्तदाब, डोळ्यांची आणि दंत तपासणी करण्यात आली. महापालिकेतर्फे मोफत लसीकरण करण्यात आले.

यावेळी माजी महापौर शैलजा नवलाई, डॉ. भालचंद्र साठे, डॉ. पंकज म्हेत्रे, डॉ. भरत शहा, डॉ. अलका तोडकर, उद्योजक अशोक पाटील, जयपाल चिंचवाडे, शीतलनाथ पाटील, रमाकांत घोडके, नगरसेविका स्वाती शिंदे, आर. बी. पाटील उपस्थित होते. ट्रस्टचे भीमसेन नवलाई, प्रकाश जाधव, बबन मंडलिक, राहुल नवलाई आदींनी संयोजन केले.

Web Title: Response to Om Ganesh Mandal Health Checkup Camp