शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू दूध संघाची निवडणूक बिनविरोध

By admin | Updated: May 23, 2015 00:30 IST

पंधरा उमेदवारांची माघार : अकरा विद्यमान, तर सात नव्या चेहऱ्यांना संधी

इस्लामपूर : राजारामबापू दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक अपेक्षेनुसार बिनविरोध झाली. शुक्रवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्यामुळे संघाच्या कार्यस्थळावर ठाण मांडून बसलेल्या आ. जयंत पाटील यांनी शेवटच्या दोन मिनिटात विद्यमान उपाध्यक्ष संग्राम फडतरे यांच्यासह तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुस्मिता जाधव यांचे अर्ज मागे घेण्याची सूचना करत धक्का दिला. नव्या संचालक मंडळात ११ विद्यमान, तर ७ नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली.दूध संघाच्या कार्यस्थळावरील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी डी. पी. देसाई व सहायक अधिकारी एस. व्ही. लोंढे यांच्यासमोर ही अर्ज माघारीची प्रक्रिया झाली. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी एकूण ३३ उमेदवारी अर्ज होते. छाननीत हे सर्व अर्ज वैध ठरले. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत १५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. तीनशे कोटींची उलाढाल असणाऱ्या दूध संघावर संचालक म्हणून जाण्यासाठी बऱ्याचजणांनी बरीच खळबळ केली. मात्र संघाचे मार्गदर्शक आ. जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतच पाच संचालकांना ‘आऊट’ केल्याने अर्ज माघारीपर्यंत आणखी किती जणांवर गंडांतर येईल, याची धाकधूक अर्ज राहिलेल्यांच्या मनात होती. शेवटी जयंत पाटील यांनी विद्यमान उपाध्यक्ष फडतरे व संचालिका सुस्मिता जाधव यांना संघाच्या पटावरून पायउतार करुन एकूण सात संचालकांना थांबवून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. नव्या संचालक मंडळात विद्यमान अध्यक्ष नेताजीराव पाटील (तांबवे), विनायकराव पाटील (ताकारी), अशोकराव पाटील (बोरगाव), विलासराव पाटील (कुरळप), उदयसिंह पाटील (कासेगाव), जगन्नाथ पाटील (भडकंबे), सोमराज देशमुख (चिकुर्डे), रमेश पाटील (भवानीनगर), सुनीता देशमाने (पेठ), विकास कांबळे (येडेनिपाणी), उज्ज्वला पाटील (आष्टा) या जुन्या संचालकांसह मंगल बाबर (तुजारपूर), प्रशांत थोरात (वाळवा), बाळासाहेब पाटील (इस्लामपूर), बबनराव सावंत (नरसिंहपूर), शशिकांत पाटील (ठाणापुडे), बजरंग खोत (गाताडवाडी), अनिल खरात (खरातवाडी) अशा सात नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. (वार्ताहर)जयंतरावांचे धक्कातंत्रनवीन संचालक निवडत असताना जुन्याजाणत्या संचालकांवर अंकुश राहावा, अशी व्यवस्था करीत जयंत पाटील यांनी विद्यमान संचालक मंडळातील सात संचालकांना बाहेरचा रस्ता दाखवला. आज अर्ज माघारीच्या दिवशी त्यांच्या रडारवर चार संचालक होते. त्यातील उपाध्यक्ष फडतरे व संचालिका सौ. जाधव यांच्यावर अर्ज माघारीची कुऱ्हाड कोसळली. सरकार आणि एक पाहुणेसुध्दा या यादीत होते. मात्र संघात असलेल्या पाहुण्यांच्या मांदियाळीने हे संकट परतवून लावण्यात यश मिळविले.