उमदी परिसरात आर. सी. होर्तीकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:41+5:302021-09-14T04:30:41+5:30

उमदी : सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. सी. होर्तीकर यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध संस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यामध्ये ...

R. in Umadi area. C. Greetings to Hortikar | उमदी परिसरात आर. सी. होर्तीकर यांना अभिवादन

उमदी परिसरात आर. सी. होर्तीकर यांना अभिवादन

उमदी : सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आर. सी. होर्तीकर यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त विविध संस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यामध्ये युवक राष्ट्रवादी कार्यालय उमदी, सर्वोदय शिक्षण संस्था येथील मुख्य कार्यालय, महात्मा विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज उमदी, शरणगुरुजी हायस्कूल बेंळोडगी, समता प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज समतानगर, सर्वोदय माध्यमिक विद्यालय शिवणगी आदी ठिकाणी आर. सी. होर्तीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले, तसेच पुस्तक वाटप, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसह अन्य उपक्रम राबविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष फिरोजभाई मुल्ला, युवा नेते रवींद्र शिवपुरे, राहुल संकपाळ, तालुका सरचिटणीस इस्माईल सय्यद, प्रा. महादेव हडसंग, प्रा. गणेश शेवाळे, प्रा. डी. सी. बासरगाव, प्रा. एस. सी. जमादार, मुख्याध्यापक रमेश खरोशी, मच्छिंद्र इम्मनवर आदी उपस्थित होते.

Web Title: R. in Umadi area. C. Greetings to Hortikar