मारहाणप्रकरणी ताकारीच्या दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST2021-03-07T04:23:30+5:302021-03-07T04:23:30+5:30

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील शेतजमिनीतील तुतूचा ताटवा तोडल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत वृद्ध महिलेच्या हातावर खुरप्याने वार करून ...

Punishment of both Takari in the beating case | मारहाणप्रकरणी ताकारीच्या दोघांना शिक्षा

मारहाणप्रकरणी ताकारीच्या दोघांना शिक्षा

इस्लामपूर : ताकारी (ता. वाळवा) येथील शेतजमिनीतील तुतूचा ताटवा तोडल्याच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत वृद्ध महिलेच्या हातावर खुरप्याने वार करून तिला जखमी करणाऱ्या दोघांना दोषी धरून येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पठाण यांनी न्यायालय उठेपर्यंत शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सुहास वसंत पाटील आणि संगीता वसंत पाटील अशी शिक्षा झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. त्यांनी केलेल्या हल्ल्यात आक्काताई रामचंद्र पाटील या वृद्ध महिला जखमी झाल्या होत्या. दंडाच्या १० हजार रुपयांच्या रकमेपैकी आठ हजार रुपये फिर्यादी जखमी आक्काताई पाटील यांना देण्याचे आदेश न्या. पठाण यांनी दिले.

मारहाणीची ही घटना १ जानेवारी २०१९ रोजी घडली होती. फिर्यादी व आरोपी यांची शेतजमीन लागूनच आहे. आक्काताई पाटील यांच्या शेताच्या बांधावर तुतूच्या पिकाचा ताटवा होता. वसंत भगवान पाटील आणि शालन वसंत पाटील यांनी हा ताटवा तोडून शेतात लपवून ठेवला होता. त्यावर आक्ताताई यांनी आरोपींच्या घरासमोर जाऊन तुतूचा ताटवा का तोडला, असे विचारले असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करीत खुरप्याने त्यांच्यावर हातावर वार करून जखमी केले. सरकार पक्षातर्फे भैरवी मोरे यांनी काम पाहिले. पोलीस कर्मचारी संदीप शेटे यांनी खटल्याच्या कामकाजात सरकार पक्षाला मदत केली.

Web Title: Punishment of both Takari in the beating case