शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक ‘कसाब’ बॉम्बहल्ल्याची धमकी देतो तेव्हा..

By घनशाम नवाथे | Updated: May 15, 2024 14:00 IST

सांगली पोलिसांकडून गुन्हा दाखल; धमकीच्या कॉलनंतर उडाली होती धावपळ

सांगली : मुंबईत २६/११ चा दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला तर फाशी देण्यात आली. परंतू आणखी एका रियाज कसाब याने सांगली शहर पोलिस ठाण्यात दूरध्वनी करून रेल्वेस्थानक आरडीएक्सने उडवून धमकी दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. तथाकथित रियाज कसाब याने पाकिस्तानातील लाहोरमधून सांगलीत आल्याचे दूरध्वनीवरून बोलताना सांगितले होते. त्यामुळे सोमवारी रात्रभर पोलिसांना सांगली, मिरज रेल्वेस्थानकावर शोध मोहिम राबवावी लागली. पोलिसांनी चांगलीच धावपळ उडाली. अखेर याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात रियाज कसाब नामक व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला.अधिक माहिती अशी, दि. १३ रोजी रात्री सव्वा आठ वाजता शहर पोलिस ठाण्यात फोन करून रियाज कसाब बोलत असल्याचे सांगितले. पाकिस्तानातील लाहोर येथून सांगलीत आलो आहे. रेल्वे स्थानक बॉम्बने उडवणार असून मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथेही त्याची माणसे पोहोचली असून बॉम्बस्फोट करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाणे अंमलदारांनी स्टेशन डायरीस नोंद करून वरिष्ठांना कळवले. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप घुगे हे मिरज रेल्वे स्थानकावर तर अप्पर अधीक्षक रितू खोखर या सांगली रेल्वेस्थानकावर पथकासह पोहोचल्या. तत्काळ बॉम्बशोधक व श्वान पथकामार्फत तपासणी करण्यात आली. हा प्रकार पाहून सुरवातील सर्वांना प्रात्यक्षिक असल्याचे भासले.परंतू उशिरापर्यंत पोलिसांकडून रेल्वे स्थानक परिसरात तपासणी सुरू होती. रात्री उशीरापर्यत पोलिस फौजफाटा परिसरात तैनात होता. पोलिसांना रेल्वे स्थानकावर काहीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. कोणीतरी मुद्दाम हा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे रेल्वे स्थानकातील प्रवासी आणि इतर व्यक्तींना तसेच पोलिसांनाही त्रास सहन करावा लागला. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर रियाज कसाब नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस हवालदार संदीप पाटील यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.मुंबईतून कॉल आलासांगली शहर पोलिस ठाण्यात रियाज कसाब नावाने आलेला कॉल मुंबईतून आल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी आलेला मोबाईल क्रमांक शोधून काढला आहे. हा मोबाईल चोरला असून त्यावरून कॉल केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. सांगली शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेPoliceपोलिस