शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 :प्रचारासाठी वॉररूममध्ये राजकीय पक्षांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 11:15 IST

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी हाती असल्याने वॉररूम सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर भर दिला आहे.

ठळक मुद्देप्रचारासाठी वॉररूममध्ये राजकीय पक्षांची लगबग निवडणुकीसाठी कमी प्रचार कालावधी

शरद जाधव सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी हाती असल्याने वॉररूम सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही निवडणुकांपासून सोशल मीडियावरील प्रचाराला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यावर भर दिला आहे. पक्षकार्यालयांसह प्रचार कार्यालयात लगबग असून, प्रचारसाहित्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीसाठी कमी प्रचार कालावधी मिळाल्याने अगोदरच उमेदवारांना सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या. सध्या प्रचाराची यंत्रणा बघितली, तर कार्यकर्त्यांनीच नियोजन हाती घेत काम सुरू केले आहे.सांगलीतील काँग्रेस कमिटीत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचे कार्यालय असले तरी, कमिटीबरोबरच सांगली-मिरज मार्गावर असलेल्या पाटील यांच्या निवासस्थानामधूनही प्रचारयंत्रणा राबविण्यात येत आहे. प्रचारासाठीचे साहित्य प्रत्येक गावात, प्रभागात पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

पाटील यांच्या प्रचाराचे नियोजन बिपीन कदम यांच्याकडे आहे. त्यांच्याबरोबरच शहरातील प्रचाराचे नियोजन नगरसेवक अभिजित भोसले पाहत आहेत, तर स्वत: पृथ्वीराज पाटील यांच्या दिवसभरातील कार्यक्रमांचे नियोजन मेहबूब मुतवल्ली करत आहेत.

सोशल मीडियाचीही जबाबदारी कार्यकर्त्यांवरच आहे. सोशल मीडियावरील प्रचारासह प्रभागनिहाय बैठका, कोपरा सभा, जाहीर सभा, महिला मेळाव्याचेही नियोजन करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील प्रचारासाठी वॉररूम सज्ज करण्यात आली आहे.भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचाराचे नियोजन बापट मळा परिसरातील पक्षाच्या कार्यालयातून होत आहे. याशिवाय विश्रामबाग येथील संपर्क कार्यालयातही कार्यकर्त्यांचा राबता कायम असतो. भाजपकडूनही प्रचाराचे साहित्य उपलब्ध झाले असून, सभा, पदयात्रेवेळी ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

भाजपच्या प्रचाराचे नियोजन शरद नलवडे पाहत आहेत. त्यांच्यासोबत नगरसेविका भारती दिगडे, किरण भोसले, अविनाश मोहिते यांनी नियोजन केले आहे. शेखर इनामदार, नीता केळकर यांचाही नियोजनात सक्रिय सहभाग असतो.

टॅग्स :sangli-acसांगलीPoliticsराजकारण