शुल्क माफीसाठी पालकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:54+5:302021-02-05T07:24:54+5:30

सांगली : कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नसल्यामुळे मिरजेतील अल्फोन्सा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी ...

Parents protest in front of Zilla Parishad for fee waiver | शुल्क माफीसाठी पालकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

शुल्क माफीसाठी पालकांची जिल्हा परिषदेसमोर निदर्शने

सांगली : कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता आले नसल्यामुळे मिरजेतील अल्फोन्सा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी करत साेमवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.

आंदोलनामध्ये दोनशे पालक सहभागी झाले होते. आंदोलकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले की, लॉकडाऊन काळात शाळा, महाविद्यालये बंद होती. छोटे-मोठे व्यवसाय व उद्योगधंदे बंद असल्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. दि. २७ जानेवारीपासून पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. आता दोन ते तीन महिनेच शाळा सुरू राहणार आहेत. या शैक्षणिक वर्षाचा ७५ टक्के भाग संपलेला असून, फक्त २५ टक्के शिल्लक आहे. याचा विचार करता यंदाच्या वर्षाचे संपूर्ण शुल्क आकारणे योग्य नाही. संपूर्ण शुल्काच्या ७५ टक्के सवलत देऊन २५ टक्के शुल्क भरून घ्यावे. नर्सरी ते चौथीपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करावे. या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर निदर्शनेही करण्यात आली.

आंदोलनात मुनीर मुल्ला, राकेश कोळेकर, रियाज अहमद शेख, अभिजित पाटील, धनराज सातपुते, आयुब मगदूम, अल्लाबक्ष शेख सहभागी होते.

Web Title: Parents protest in front of Zilla Parishad for fee waiver