सांगलीमध्ये लॉक डाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 14:53 IST2021-04-10T14:51:24+5:302021-04-10T14:53:33+5:30

CoronaVirus Sangli-सांगली शहरांमध्ये लॉक डाऊनला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

One hundred percent response to lockdown in Sangli | सांगलीमध्ये लॉक डाऊनला शंभर टक्के प्रतिसाद

सांगली जिल्ह्यात कडक संचारबंदी सुरु झाली आहे. या विकेंड लॉकडाऊनला नागरिकांनी प्रतिसाद दिला असून अत्यावश्यक सेवा वगळून संपूर्ण बाजारपेठ बंद आहे.(छाया :सुरेंद्र दुपटे)

ठळक मुद्देसांगलीमध्ये लॉक डाऊनला शंभर टक्के प्रतिसादवर्दळ शांत होऊन रस्ते पडले ओस

सांगली -शहरांमध्ये लॉक डाऊनला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत.

सांगली शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले गणपती पेठ, मारुती रोड, हरभट रोड, सराफ कट्टा, बाजारपेठ आदी परिसरात नीरव शांतता निर्माण झाली आहे.  अधूनमधून काही मोटारसायकलस्वार, चारचाकी वाहने मात्र शहरात फिरत असल्याचे दिसत होते. औषध दुकाने मात्र सुरू होती.

सांगली शहरातील मुख्य  ठिकाणी सर्वत्र शुकशुकाट आहे. शहरामध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त असून. सांगलीकरांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे.  गजबजणारे शहर आणि परिसरात एकदम शांतता निर्माण झाली. निर्मनुष्य रस्ते, नीरव शांतता यामुळे गतवर्षीच्या लॉकडाऊनची आठवण झाली.

पोलीस आणि महानगरपालिकेची पथके रस्त्यावर उतरली. हातगाड्या, फेरीवाले, हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोलपंप चालक व्यवसाय बंद आहेत. शहरातील सर्व रस्ते रिकामे निर्मनुष्य झाले आहेत. शहरातील वर्दळ शांत होऊन रस्ते ओस पडले आहेत.

Web Title: One hundred percent response to lockdown in Sangli