शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चौंडेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव गुरुवार दिनांक २१ ते २८ जानेवारी अखेर परंपरागत पद्धतीने उत्साहात साजरा ...

आष्टा : येथील श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव गुरुवार दिनांक २१ ते २८ जानेवारी अखेर परंपरागत पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्सवकाळात पहाटे देवीस अभिषेक, महापूजा, सकाळी ७ ते ८ आरती, छबिना सकाळी ८ ते ९, दुर्गा सप्तशती पाठ व ह.भ.प. प्रकाश महाजन यांच्या सत्संगाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी आरती व छबिना तसेच रात्री प्रवचन, व्याख्यान, भजन यासह देवीचा जागर, गोंधळ, भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. तसेच गुरुवारी सकाळी संदीप शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात सरकार यांच्या उपस्थितीत नवचंडी होम झाला तसेच कुमारिका व सौभाग्यवती पूजन करण्यात आले. उत्सवकाळात संतोष गुरव, शीतल गुरव व महेश गुरव यांच्यासह मंदार माळी यांनी देवीची आकर्षक पूजा बांधली. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरुवार, दि. २८ पासून शाकंभरी नवरात्रोत्सव समितीच्या वतीने शहरातील विविध भागांत भाविकांना लाडूच्या प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.

फोटो : २९०२२०२१-आयएसएलएम-आष्टा चौंडेश्वरी न्यूज

श्री चौंडेश्वरी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त देवीची १०८ प्रकारच्या विविध पालेभाज्यांमध्ये आकर्षकरीत्या महेश गुरव, शीतल गुरव, संतोष गुरव व मंदार माळी यांनी पूजा बांधली.