शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाची देणगी! शिराळ्यात दुर्मिळ 'खापर खवल्या' सापाचे दर्शन; सर्पमित्रांनी केले सुरक्षित स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 16:14 IST

Sangli News: सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घटना शिराळा येथे नुकतीच घडली आहे. येथील गुरुवार पेठ येथे  दुर्मिळ समजला जाणारा आणि विशेषतः 'खापर खवल्या' जातीचा बिनविषारी साप आढळून आला. निसर्गातील जैवविविधतेचे प्रतीक असलेला हा साप दृष्टीस पडल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

- विकास शहा शिराळा -  सर्पमित्र आणि वन्यजीव अभ्यासकांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची घटना शिराळा येथे नुकतीच घडली आहे. येथील गुरुवार पेठ येथे  दुर्मिळ समजला जाणारा आणि विशेषतः 'खापर खवल्या' जातीचा बिनविषारी साप आढळून आला. निसर्गातील जैवविविधतेचे प्रतीक असलेला हा साप दृष्टीस पडल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या अनेक दुर्मीळ वन्यजीव आणि सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत दिसून येत असताना, शिराळा येथे 'खापर खवल्या' सापाचे दर्शन होणे, ही येथील समृद्ध नैसर्गिक वातावरणाची साक्ष आहे. गुरुवार पेठ येथील सूर्यकांत शहा यांच्या घराजवळील नाल्याजवळ विपुल शहा यांना हा साप दिसला.काळया रंगाचा पिवळ्या ठिपक्याचा एक फूट लांबीचा सदर साप दिसल्यावर तातडीने वनपाल दत्तात्रय शिंदे यांना याबाबत कळविले. प्राणिमात्र सुशीलकुमार गायकवाड तातडीने याठिकाणी आले.यावेळी विपुल शहा व गायकवाड यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने या दुर्मीळ सापाला पकडले. कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, त्याला सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या मदतीने त्याच्या नैसर्गिक आणि सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आले.

या सापाची माहिती घेतली असता'खापर खवल्या' जातीचा बिनविषारी साप  हा साप असल्याचे समोर आले.जमिनीखाली राहणारा आणि सहसा कमी दिसणारा आहे. त्याच्या शेपटीचे टोक गोलाकार, खडबडीत आणि खवल्यांनी झाकलेले असते, ज्यामुळे त्याला 'खापर खवल्या' हे नाव पडले आहे. या सापाची माहिती मिळताच परिसरातील जागरूक सर्पमित्र तातडीने घटनास्थळी पोहोचले.

जागरूकतेचे कौतुक विपुल शहा यांनी दाखवलेली जागरूकता आणि सर्पमित्रांनी केलेले अचूक रेस्क्यू ऑपरेशन यामुळे या दुर्मीळ जीवाचे प्राण वाचले. साप दिसल्यास त्याला मारण्याऐवजी, तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाला कळवून त्याचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे, याचे उत्कृष्ट उदाहरण शिराळावासियांनी घालून दिले आहे.

नाग भूमीमध्ये काही दिवसांपूर्वी स्लेंडर कोरल स्नेक म्हणजे “पोवळा सर्प” असं म्हटलं जातं हा साप आढळून आला होता तर आज खापर खवल्या साप आढळून आला आहे.वन्यजीव अभ्यासकांच्या मते, 'खापर खवल्या' सापाचे आढळणे हे परिसंस्थेच्या आरोग्यासाठी शुभचिन्ह मानले जाते. या घटनेमुळे शिराळ्याच्या निसर्गातील दुर्मिळ जीवांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rare snake sighted in Shirala, rescued by snake rescuers.

Web Summary : A rare 'khaapar khavlya' snake, a non-venomous species, was found in Shirala and safely relocated by wildlife rescuers. This sighting highlights the area's rich biodiversity and the importance of wildlife conservation efforts.
टॅग्स :Sangliसांगलीsnakeसाप