शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पालिकेचा करवाढीस खो

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

‘जैसे थे’ परिस्थिती : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मुदतवाढ--खेळखंडोबा तासगावचा-३

दत्ता पाटील - तासगाव -कराच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र तासगाव नगरपालिकेने तीन वर्षांनंतर आवश्यक असणारी करवाढच केल्याचे दिसून येत नाही. विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने वर्षभरासाठी करवाढीला मुदतवाढ देता येऊ शकते. परंतु त्यासाठी परवानगी घेतल्याचेही दिसून येत नाही. कारभाऱ्यांचा हा कमालीचा गाफीलपणा आणि प्रशासनाचा दिरंगाईचा कारभार यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नवाढीच्या मुख्य स्रोताकडेच साफ दुर्लक्ष झाले आहे. एकीकडे अशी अवस्था असताना दुसरीकडे मात्र निधीअभावी अनेक योजना ठप्प असल्याचेही चित्र दिसून येत आहे.घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून नगरपालिकेला उत्पन्न मिळत आहे. कराच्या माध्यमातून वर्षाला दीड कोटीपर्यंत उत्पन्न मिळत आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीची शंभर टक्के वसुली झाल्यास यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. मात्र या वसुलीसाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली होत असल्या तरी, लोकप्रतिनिधींकडून मात्र कर वसुलीसाठी कधीच गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्याचा फटका नगरपरिषदेच्या उत्पन्नवाढीला बसला आहे. प्रत्येक तीन वर्र्षांनी कर आकारणीत बदल करुन दहा टक्के करवाढ करण्यात यावी, असा नियम आहे. काही अपवादात्मक प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने एक वर्षासाठी करवाढीसाठी मुदतवाढ घेता येऊ शकते. परंतु नगरपालिकेकडून २०१०-११ मध्ये करवाढ केल्यानंतर आजअखेर करवाढ केल्याचे दिसून येत नाही. तीन वर्षे झाल्यानंतर दुष्काळी परिस्थितीमुळे एक वर्षासाठी मुदतवाढ घेण्याचा ठराव करण्यात आला. मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. एकूणच नगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत्र असणाऱ्या कर आकारणी आणि वसुलीकडेच साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.वर्ष घरपट्टी (लाखात) वसुलीची टक्केवारी२०१०-११ ५१.४२ ७२.४१२०११-१२ ६२.४९ ८६.८४२०१२-१३ ५३.६२ ६४.९७२०१३-१४ ६७.६० ७१.४१२०१४-१५ ८०.५७ ८०.८७चार विभाग, एक अभियंता नगरपालिकेला चार विभागांसाठी चार अभियंत्यांची आवश्यकता आहे. मात्र सध्या नगररचना, पाणी पुरवठा, ई - गव्हर्नन्स आणि सार्वजनिक बांधकाम अशा चारही विभागांचा कार्यभार एका अभियंत्याकडे आहे. त्यामुळे शहरात नव्याने तयार होणाऱ्या मालमत्ता आणि त्यातून मिळणाऱ्या नोंदी याकडे लक्ष केंद्रित करणे अशक्य होत आहे. त्याचाही परिणाम उत्पन्नवाढीवर होत आहे.