शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सोनपरी डॉल ते लकी ड्रॉचा भूलभुलय्या

By admin | Updated: May 22, 2015 00:11 IST

आष्टावासीयांची लाखोंची फसवणूक : नागरिकांच्या प्रबोधनाची गरज

सुरेंद्र शिराळकर - आष्टा -आष्टा शहरात काही वर्षांपूर्वी सोनपरी डॉलने धुमाकूळ घातला होता. यामध्ये लाखो रुपये बुडूनसुध्दा आष्ट्यातील जनतेला अनेक लोक फसवित आहेत. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण फसले जात आहोत, हे माहीत असतानाही अनेक लोक या योजनेमध्ये पैसे गुंतवून फसत आहेत. हा सिलसिला सुरूच राहणार का? अशा फसवणुकीचा ब्रेक लागणार, याची शहरात चर्चा आहे.आष्टा या निमशहरी गावात काही वर्षांपूर्वी सोनपरी डॉल नावाची योजना जोरात सुरू होती. ठराविक रक्कम भरायची. त्या बदल्यात बाहुल्या तयार करून द्यायच्या, अशी योजना होती. यामध्ये अनेकांनी लाखो रुपये भरले होते. त्या बदल्यात सुरुवातीस बाहुल्या तयार करून देण्यात येत होत्या, मात्र सदस्य वाढल्यानंतर बाहुल्या तयार न करताच त्यांना घरबसल्या आठ दिवसात पैसे मिळू लागल्याने अनेकांनी यात पैसे गुंतविले. प्रत्यक्षात ठराविक बाहुल्याच मोडून पुन्हा पुन्हा तयार करण्यात येत होत्या.आष्ट्यातून एकही बाहुली विक्रीसाठी गेली नाही. पोलिसांनी कारवाईचा फार्स केला. हजारो लोकांचे लाखो रुपये पाण्यातगेले.याचप्रमाणे अनेक साखळी योजना आष्ट्यात आल्या. त्यांनी लाखो रुपये मिळवले व परागंदा झाले. याचप्रमाणे आष्टा येथील शिंदे चौकात प्रवीण दीपक आडसूळ याने मृत्युंजय मार्केटिंग ही योजना आणली. लकी ड्रॉच्या माध्यमातून ३५०० सभासदांकडून प्रत्येकी २५०० रुपये गोळा केले. यातील सभासदांना प्रत्येक रविवारी लकी ड्रॉ सोडत काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात होत होती. मात्र सुमारे ८७ लाखांच्या दरम्यान रक्कम जमा करून त्यातील काही रकमेच्या निकृष्ट वस्तू घेऊन त्या प्रत्येक सोडतीला देण्यात आल्या. या लकी ड्रॉमध्ये काहींना मोटार, मोटारसायकलुाह मोठ्या किंमतीच्या वस्तू केवळ २५०० रुपयात मिळाल्या. मात्र इतरांना निकृष्ट दर्जाच्या वस्तू देऊन फसविल्याने पाच सभासदांनी प्रवीण आडसूळविरोधात आष्टा पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.या घटनेत ८७ लाख जमा करून निम्म्या रकमेच्या वस्तू देऊन तीन महिन्यात लाखो रुपये मिळविणाऱ्यांना सजा होणार का, याकडे आष्टेकरांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही कमी दरात वस्तू किंवा कमी गुंतवणुकीत भरपूर पैशाच्या आमिषाला बळी न पडता जागरूक राहण्याची गरज आहे.+कारवाई होणार का?आष्ट्यात छोट्या-मोठ्या गुंतवणूक योजना आल्या. चालकांनी दुप्पट पैशाचे आमिष दाखवून हजारोंना फसविले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद होतो. परंतु पुढे काहीच होत नाही. मृत्युंजय मार्केटिंगचा अध्यक्ष प्रवीण आडसूळविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद असला तरी, हा केवळ पोलिसी कारवाईचा स्टंट होणार की दोषींना खरोखरच सजा होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.