शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

खानापूर, जतमध्ये राष्ट्रवादीला धक्का

By admin | Updated: September 15, 2014 00:24 IST

पंचायत समिती सभापती निवड : राजकीय समीकरणे बदलल्याचा परिणाम

सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतींच्या निवडी आज, रविवारी पार पडल्या. राष्ट्रवादीने चार, काँग्रेसने तीन, तर आघाडीने एका पंचायत समितीवर वर्चस्व राखले. खानापूर व जत या दोन्ही तालुक्यांतील राजकीय समीकरणे बदलल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला.जिल्ह्यातील दहा पंचायत समितींच्या सभापती, उपसभापतिपदाच्या निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. दहापैकी सहा पंचायत समितीतील सभापती निवडी बिनविरोध पार पडल्या. काँग्रेसने पलूस, कडेगाव व मिरज या तीन पंचायत समितींवर वर्चस्व राखले. पलूसच्या सभापतिपदी विजय कांबळे, उपसभापती रंजना पवार, कडेगावच्या सभापतिपदी लता महाडिक, उपसभापतिपदी विठ्ठल मुळीक, तर मिरजेच्या सभापतिपदी दिलीप बुरसे व उपसभापतिपदी तृप्ती पाटील यांची निवड झाली. राष्ट्रवादीने चार पंचायत समितींवर वर्चस्व राखले. यात वाळवा, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळचा समावेश आहे. वाळव्यात रवींद्र बर्डे व भाग्यश्री शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली, तर शिराळ्यात चंद्रकांत पाटील यांची सभापतिपदी, तासगावच्या सभापतिपदी हर्षला पाटील, तर कवठेमहांकाळच्या सभापतिपदी वैशाली पाटील यांची निवड झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत आणि खानापूर या दोन मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. जतचे विलासराव जगताप यांनी भाजपशी संधान साधले आहे, तर खानापूरचे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार अनिल बाबर यांनी शिवसेनेशी नाते जोडले आहे. त्यामुळे या दोन्ही पंचायत समितीत राष्ट्रवादीला धक्का बसला. जतला जगताप समर्थक लक्ष्मी मासाळ यांची सभापतिपदी, तर ‘जनसुराज्य’च्या बिरदादा जहागीरदार याची उपसभापतिपदी निवड झाली, तर खानापुरात बाबर समर्थक वैशाली माळी व सुहास बाबर यांची अनुक्रमे सभापती व उपसभापतिपदी निवड झाली. (प्रतिनिधी)