शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात भुयारी गटार योजना ठरतेय कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : नगरपालिका सभागृहात नुकतीच भुयारी गटार योजनेवर वादळी चर्चा झाली. सत्ताधारी-विरोधकांतून आरोप-प्रत्यारोप झाले. या योजनेबाबत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : नगरपालिका सभागृहात नुकतीच भुयारी गटार योजनेवर वादळी चर्चा झाली. सत्ताधारी-विरोधकांतून आरोप-प्रत्यारोप झाले. या योजनेबाबत अभ्यासपूर्वक चर्चा झाली नसल्याने यामध्ये फक्त राजकारणच असल्याचे दिसून आले. या कामाला गती दिली नाही तर शहरातील इतर विकासाला ब्रेक लागणार आहे.

मागील सत्ताधारी राष्ट्रवादीने भुयारी गटारी योजनेची घोषणा केली. प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला, परंतु राज्यात युती शासन असल्याने त्यात राजकारण झाले, अशी चर्चा होती. त्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीने रस्त्यासाठी असलेला ३० कोटींचा निधी वळविला. व्याजासह ही रक्कम ४० कोटींच्या घरात गेली आहे. त्यानंतर पालिकेत सत्ताबदल झाला. नंतर सत्ताधारी विकास आघाडीने भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावात बदल करून एसटीपीच्या जागा ताब्यात घेऊन भुयारी गटारीच्या कामाचा प्रारंभ करणे आवश्यक होते. परंतु तसे न करता शासनाकडून थेट भुयारी गटारी कामाची मंजुरी आणली. कामास प्रारंभही केला. आता या कामाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने स्थगिती दिली आहे.

महाआघाडी सरकारने दहा कोटी रुपये रस्त्यासाठी दिले आहेत. हा निधी भुयारी गटारी योजना पूर्ण झाल्याशिवाय खर्च करू नये, असा मतप्रवाह आहे. भुयारी गटार वेळेत नाही झाली तर हा निधी रस्त्यांसाठी खर्च करण्याची तयारी पालिकेने दर्शविली आहे. शहर आणि उपनगरांतील रस्ते होण्यासाठी भुयारी गटार योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी एसटीपीच्या जागा ताब्यात घेणे गरजेचे आहे. ही कार्यवाही झाली नाही तर भुयारी गटारीचे काम ठप्प होणार आहे. ती योजना वेळेत पूर्ण झाली नाही तर रस्त्यांची कामेही खोळंबणार आहेत.

कोट

येत्या महिन्यात एसटीपीच्या जागा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतर त्वरित भुयारी गटारीचे काम सुरू होईल. येणाऱ्या निवडणुकीपर्यंत भुयारी गटारीची योजना पूर्ण करू.

- विक्रम पाटील, गटनेते, विकास आघाडी