शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राजे, महाराजेंना मी घरी बसवले, मंत्री जयकुमार गोरे यांनी सोडले टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 12:58 IST

आटपाडी : राजे, महाराजे तसेच मिसाइल डागणाऱ्यांना मी घरी बसवले असल्याने माझ्या बदनामीचे विरोधकांनी रचलेले षड्यंत्र त्यांच्यावर उलटविले, अशी ...

आटपाडी : राजे, महाराजे तसेच मिसाइल डागणाऱ्यांना मी घरी बसवले असल्याने माझ्या बदनामीचे विरोधकांनी रचलेले षड्यंत्र त्यांच्यावर उलटविले, अशी टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली.आटपाडी येथे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, विश्वनाथ मिरजकर, जगन्नाथ कोळपे, यू. टी. जाधव, उदय शिंदे, सयाजीराव पाटील, जयवंत सरगर, महादेव पाटील, आदी उपस्थित होते.यावेळी गोरे म्हणाले की, सध्या इंग्लिश माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. तो का वाढला याचा विचार शिक्षकांनी करण्याची वेळ आली आहे. प्राथमिक शिक्षकांनी शाळेचा पट का कमी होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्या प्राथमिक शाळांचा पट जास्त आहे, अशा शाळांची यादी करून तिथला अभ्यास करणे गरजेचे आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही; मात्र शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण सोडू नये, असे त्यांनी आवाहन केले.आमदार पडळकर म्हणाले, सांगली जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र टुडी यांनी सुरू केलेला मॉडेल स्कूलचा उपक्रम शासनाने स्वीकारला आहे. मात्र, त्याची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे. शिक्षकांनी आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शासनाला विविध कल्पना, प्रयोग, प्रकल्प सुचवणे गरजेचे आहे.यावेळी यू. टी जाधव यांनी शिक्षकांच्या विविध मागण्या मांडल्या. २०२५ ची नवीन संचमान्यता रद्द करावी, जुनी पेन्शन योजना सुरू करावी, रिक्त असणारी केंद्रप्रमुख पदे सेवाज्येष्ठतेनुसार पूर्ण भरावी, एमएससीआयटीची अट शिथिल करावी, अशैक्षणिक कामांपासून शिक्षकांची सुटका करावी, आदी मागण्यांचा यात समावेश होता. यावेळी उदय शिंदे, जगन्नाथ कोळपे यांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसरJayakumar Goreyजयकुमार गोरेPoliticsराजकारण