शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेविकेच्या परीक्षेचा पेपर फुटला

By admin | Updated: November 26, 2015 00:23 IST

जिल्हा परिषद : दोन आरोग्य सेविकांवर गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश; प्रशासनात खळबळ

सांगली : जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या पदांसाठी घेण्यात येत असलेल्या आरोग्य सेवक (महिला) या पदासाठीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार बुधवारी दुपारी परीक्षेदरम्यान उघडकीस आला़ याप्रकरणी शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) आणि तिला मदत करणाऱ्या एका आरोग्य सेविकेवर जिल्हा परिषद प्रशासनाने सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतरच पेपर फुटीचा सूत्रधार बाहेर येण्याची शक्यता आहे. पेपर फुटीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या परीक्षेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांसाठी बुधवारपासून लेखी परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी परीक्षा होती़ आरोग्य सेवक (महिला) पदाच्या ३८ जागांसाठी ९१५ उमेदवार होते़ दुपारी दोन वाजता आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी लेखी परीक्षा होती़ ग़ रा़ पुरोहित कन्या प्रशालेतील वर्ग क्रमांक आठ येथे पर्यवेक्षक कांतिनाथ जोशी यांनी प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उमेदवारांना उत्तरपत्रिका दिली़ या वर्गातील शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ वर्गातील शेजारच्या उमेदवारांना त्याबाबत शंका आली़ प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली जात असल्याबाबत पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले़ काही वेळाने वर्गातील सर्व उमेदवारांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर सर्व उमेदवारांनी उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ पर्यवेक्षकाने जाब विचारल्यानंतर शाहीनने बाथरुमला जाण्याचा बहाणा केला़ बाथरुमला गेल्यानंतर ती पायजमा बदलून आली़ कपडे बदलल्यानंतरही तिच्या पायजम्यावर उत्तरे लिहिली असल्याचे निदर्शनास आले़ पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुखांनी शाहीनला उलटसुलट विचारण्यास सुरुवात केल्यानंतर तिची बोबडी वळली़ प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वीच शाहीनने अर्ध्याहून अधिक उत्तरे लिहिली होती़ याप्रकरणी जिल्हा परिषदेकडील कंत्राटी आरोग्य सेविकांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ दोघींवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे़ पेपर फुटीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले़ पेपर फुटल्याने परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली असून फेरपरीक्षा होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)मदतनीस ताब्यात : शाहीनची बोबडी वळलीशाहीनला तात्काळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली़ शाहीन जमादार ही शेटफळे येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे़ तिला मदत करणारी उमराणी ही आरोग्य सेविका म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले़ प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उत्तरे लिहिली जात असल्याने पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली़. शाहीन व उमराणी या दोघी जि. प.कडे कार्यरत असल्याने दोघींवर निलंबनाची कारवाई होणार आहे़दोन्ही झेडपीच्या कर्मचारीपेपर फुटल्याच्या प्रकरणात सापडलेली शाहीन जमादार ही शेटफळे आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे, तर तिला मदत करणारी उमराणी ही नियमित आरोग्यसेविका आहे़ चौकशीत दोघीही जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले़