प्रभाग समित्या पुनर्रचनेचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST2021-03-08T04:24:48+5:302021-03-08T04:24:48+5:30

सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांवरील वर्चस्वासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या तीन प्रभाग समित्या ...

Ghat of Ward Committee Reconstruction | प्रभाग समित्या पुनर्रचनेचा घाट

प्रभाग समित्या पुनर्रचनेचा घाट

सांगली : महापालिकेच्या चार प्रभाग समित्यांवरील वर्चस्वासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या तीन प्रभाग समित्या भाजपकडे, तर एक समिती आघाडीकडे आहे. त्यामुळे या समित्यांची पुनर्रचना करून भाजपला धक्का देण्याची तयारी आघाडीने चालविली आहे.

सांगली शहरासाठी दोन, कुपवाड व मिरजेसाठी प्रत्येकी एक प्रभाग समिती आहे. अडीच वर्षांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर जास्तीत जास्त प्रभाग समित्या आपल्या ताब्यात राहाव्यात, अशी रचना करण्यात आली. त्यामुळे भाजपला तीन प्रभाग समित्यांवर वर्चस्व ठेवता आले होते; पण नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौर निवडीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम करीत राष्ट्रवादी व कांँग्रेसने सत्ता काबीज केली. आता प्रभाग समित्यावरही वर्चस्व ठेवण्यासाठी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

सध्या प्रभाग समिती एकमध्ये १९ प्रभाग असून भाजपचे १३, तर काँग्रेस राष्ट्रवादीचे ६ सदस्य आहेत. त्यांतील भाजपच्या अर्पणा कदम यांनी आघाडीला पाठिंबा दिला होता. भाजपचे संख्याबळ पाहता या समितीत फारसे बदल होणार नाहीत. प्रभाग समिती दोनमध्ये २० पैकी १२ भाजपचे सदस्य आहेत. या समितीतील अप्सरा वायदंडे, नसीमा नाईक, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत या चार सदस्यांनी महापौर निवडीवेळी राष्ट्रवादीला मतदान केले होते. हे चार सदस्य भविष्यातही आघाडीसोबतच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समितीतील बहुमताचे गणित बदलणार आहे. प्रभाग तीनमध्ये १६ पैकी पाच सदस्य भाजपचे आहेत. या दोन प्रभाग समित्यांच्या पुनर्रचनेची शक्यता अधिक आहे. प्रभाग तीनमधील काही सदस्यांचा प्रभाग दोनमध्ये समावेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे प्रभाग समिती दोनवरील भाजपचे वर्चस्व संपुष्टात येईल. प्रभाग चारमध्ये २३ पैकी भाजपकडे काठावरचे बहुमत आहे. भाजपचे १२, तर आघाडीचे ११ सदस्य आहेत. या समितीतील आनंदा देवमाने, शिवाजी दुर्वे यांनी बंडखोरी केली आहे; तर अन्य दोन सदस्यही भाजपवर नाराज आहेत. त्यामुळे या सदस्यांनी आघाडीला मदत केल्यास तेथील भाजपच्या वर्चस्वाला धक्का बसेल.

चौकट

आघाडीकडून मोर्चेबांधणी

प्रभाग समित्यांची पुनर्रचना केल्यास आघाडीला तीन, तर भाजपकडे एकच सभापतिपद मिळू शकेल. त्यामुळे समित्यांची फेरचना करण्यासाठी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच राष्ट्रवादीकडून महापौरांना समित्यांच्या पुनर्रचनेबाबत पत्र दिले जाणार असल्याचेही समजते.

Web Title: Ghat of Ward Committee Reconstruction