Former state minister Satish Patil's mother passed away, today will be funeral in parola | माजी राज्यमंत्री सतीश पाटील यांना मातृशोक

माजी राज्यमंत्री सतीश पाटील यांना मातृशोक

पारोळा- येथील गं.भा. मणकर्णिकाबाई भास्करराव पाटील (90) यांचे गुरुवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर दि.7 रोजी दुपारी 4 वाजता पारोळा येथील किसान महाविद्यालयात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या दिवंगत आमदार भास्करराव राजाराम पाटील यांच्या पत्नी तर प्राचार्य उल्हासराव पवार, माजी राज्यमंत्री सतीश पाटील आणि माजी जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या मातोश्री होत. 

नगराध्यक्ष करण पवार आणि जि.प.सदस्य रोहन पाटील यांच्या आजी होत. मणकर्णिकाबाई पाटील यांच्या निधनाने पाटील कुटुंबासह पारोळा गावावर शोककळा पसरली आहे. 

Web Title: Former state minister Satish Patil's mother passed away, today will be funeral in parola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.