शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात प्रतीक यांची ‘एन्ट्री’

By admin | Updated: September 15, 2014 23:13 IST

ताकारीत बैठक : काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊ नये, अशीच इच्छा

बोरगाव : ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांंच्या बालेकिल्ल्यात आठ वर्षांनंतर आज माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांची एन्ट्री झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होऊ नये, ही माझी मनापासूनची इच्छा आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जयंतरावांना शह देण्यासाठी वाळवा तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून काँग्रेसची मोट बांधण्याचा माझा प्रयत्न आहे. एकदा दोन्ही पक्ष समोरासमोर लढून तरी बघुया, की कोण किती पाण्यात आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत एका व्यक्तीचा अर्थात मोदी फॅक्टर चालणार नाही, असे मत प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले. ताकारी (ता. वाळवा) येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.पाटील म्हणाले, जयंत पाटील जर सांगलीत येऊन राजकारण करत असतील, तर त्यांच्या मतदारसंघात आमच्या अजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना रिजार्च करण्याची वेळ आली आहे. मी आता पाच वर्षे मोकळा आहे. सर्व वेळ राजकारणासाठी देऊन वसंतदादांनी बांधलेली काँग्रेसची मोट व बापूंनी जपलेला वारसा पुन्हा ताकदीने पुढे चालू ठेवणार आहे. मात्र कार्यकर्त्यांनी वायफळ खर्च न करता मला आता कामे सांगावीत, अहोरात्र सेवेसाठी उभा राहीन.काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्रपणे लढले, तर या इस्लामपूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणू. परंतु एकत्र लढलो, तर राजकीय समीकरणे त्या-त्या वेळेला बदलतील. काँग्रेसच्या माध्यमातून माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांना संधी देणार का? असा सवाल पाटील यांना केला असता, अजून पक्षाने कोणताही उमेदवार ठरवला नसून पक्ष ज्याला संधी देईल, त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.वाळवा तालुक्यात राजकारणात सक्रिय होणार असून वसंतदादांचा वारसा या मतदारसंघास दाखवून देणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाटील यांनी शेवटी, आमचे कार्यकर्ते शेतकरी संघटनेत सामील झाले आहेत. त्यांना पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आणण्याची कसरत आम्हाला करावी लागणार आहे. यामध्ये नक्कीच यश मिळेल, असे सांगितले.यावेळी माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, वैभव पवार, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण चव्हाण, प्रमोद शिंदे, निशिकांत पाटील, निवास पाटील, दीपक लकेसर, प्रकाश पाटील, अशोक देसाई, पांडुरंग मोरे, धनाजी सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)आगे आगे देखो..!आघाडी झाली तर जयंत पाटील यांचा प्रचार करणार का? या प्रश्नावर प्रतीक पाटील यांनी मिष्किलपणे बोलताना ‘आगे आगे देखो होता है क्या, मी तुम्हाला भरपूर मसाला देईन, वाट पाहा,’ असे उत्तर दिले. या सर्व घडामोडीमुळे जयंत पाटील गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.