शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रामुळेच साखर उद्योग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2015 00:31 IST

जयंत पाटील : राजारामबापू कारखाना निवडणूक प्रचारास प्रारंभ

नेर्ले : केंद्र शासन साखरेचा दर ३१00 पर्यंत ठेवण्यात अपयशी ठरल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. राजारामबापू कारखाना निवडणुकीत कोणी चार अर्ज ठेवले म्हणून नाराज होऊ नका़ सभासदांच्या घरा-घरापर्यंत पोहोचा़ आपल्या पारदर्शी कारभारास सभासदांनी नेहमीच आशीर्वाद दिला आहे़ याही निवडणुकीत देतील, असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी काळमवाडी (ता. वाळवा) येथे व्यक्त केला.काळम्मादेवीच्या साक्षीने राजारामबापू साखर कारखान्याच्या निवडणुकीतील राजारामबापू सहकार पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ आ़ पाटील यांच्याहस्ते करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते़ जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे, प्रा. शामराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बी़ के. पाटील, नेताजीराव पाटील, देवराज पाटील, जि़ प़ उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, बाळासाहेब पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.ते म्हणाले की, कारखान्याचे संचालक मंडळ २६ वरून २१ झाल्याने अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देता आली नाही, याची खंत आहे़ दोन तज्ज्ञ संचालक व तीन निवड समितीच्या सदस्यपदी काही जणांना संधी देता येईल़ पी़ आऱ पाटील, प्रचारप्रमुख प्रा़ शामराव पाटील, बी़ के. पाटील यांनी, काही विघ्नसंतोषी मंडळींनी चार उमेदवार उभे करून सभासदांवर निवडणूक लादल्याचा आरोप केला.वसंत सावंत यांनी प्रास्ताविक, तर लक्ष्मण सावंत यांनी सूत्रसंचालन केले़ ए. टी़ पाटील यांनी आभार मानले. जनार्दन पाटील, विनायक पाटील, विजयबापू पाटील, दिलीप वग्याणी, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, संग्राम फडतरे, सुहास पाटील, आप्पासाहेब कदम, आनंदराव पाटील, सुरेश गावडे उपस्थित होते. (वार्ताहर)मी फसवणूक केली?विलासराव शिंदे, दिलीपराव पाटील हेच बँक निवडणुकीबाबत मोहनराव कदम यांच्याशी बोलत होते़ मी एकदाही त्यांच्याशी बोललो नाही़ मग मी त्यांना कोणता शब्द दिला आणि तो न पाळून त्यांची कशी फसवणूक केली, हे मला कळत नाही, अशा शब्दात आमदार जयंत पाटील यांनी आश्चर्य व्यक्त केले.