सुखवाडीसह चार सरपंचांचा अपात्रतेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:24 IST2021-02-05T07:24:52+5:302021-02-05T07:24:52+5:30

पलूस तालुक्यातील संबंधित चार ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची प्रक्रिया राबवताना कामे कोणाला द्यावीत याबाबचे शिफारस पत्र संबंधित गावांमधील सरपंचांनी दिली आहेत. ...

Disqualification proposal of four sarpanches including Sukhwadi | सुखवाडीसह चार सरपंचांचा अपात्रतेचा प्रस्ताव

सुखवाडीसह चार सरपंचांचा अपात्रतेचा प्रस्ताव

पलूस तालुक्यातील संबंधित चार ग्रामपंचायतींमध्ये विकासकामांची प्रक्रिया राबवताना कामे कोणाला द्यावीत याबाबचे शिफारस पत्र संबंधित गावांमधील सरपंचांनी दिली आहेत. ही पत्रे प्रशासनाकडे आली आहेत. ग्रामपंचायत सुखवाडी येथील पेव्हिंग ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी सोई सुविधा पुरवणे यासारखी कामे कोणत्या ठेकेदारास द्यावीत, याबाबतचा उल्लेख शिफारस पत्रात सरपंचांनी केला आहे. सांडगेवाडी सरपंचांनी दलित वस्तीतील कामे कोणत्या ठेकेदारास द्यावेत. याबाबत पलूस तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला सहकार्य करण्याबाबतचे शिफारस पत्र दिले. तुपारी सरपंचांनी जनसुविधा योजनेतील काम कोणत्या ठेकेदारास द्यावे याबाबत तालुका असोसिएशनला शिफारस पत्र दिले आहे. माळवाडी सरपंचांनी नागरी सुविधा योजनेतील कामे कोणत्या ठेकेदारास देण्याचे शिफारस पत्र दिले आहे.

सरपंचांनी दिलेले लेखी पत्र अतिरिक्त सीईओ गुडेवार यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी त्यावर कार्यवाही सुरू करीत संबंधित सरपंचांना अपात्र करण्याचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद बरखास्तीवरून उठलेले वादळ शांत होत असतानाच आता सरपंचांना अपात्र करण्याची कार्यवाही गुडेवार यांनी हाती घेतल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Disqualification proposal of four sarpanches including Sukhwadi