शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाच डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ :

By admin | Updated: November 21, 2014 00:29 IST

पुन्हा निविदा दाखल झाली नाही तर शासनाकडे अहवाल जाणार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास दोनवेळा मुदतवाढ देऊनही, नव्याने एकही निविदा दाखल झालेली नाही. आतापर्यंत १०३ प्लॉटस्पैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला दि. ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, ही मुदतवाढ अंतिम आहे. यावेळीही प्रतिसाद न मिळाल्यास, लिलावास प्रतिसाद नसल्याचा अहवाल शासनाकडे देणार असल्याचे, जागा विक्रीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले.वसंतदादा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची २१ कोटींची देणी अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. शेतकरी, जिल्हा बँक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकीसह जवळपास शंभर कोटींची थकबाकी कारखान्याकडे आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीला शासनानेही परवानगी दिली. जागा विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चारजणांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सह. संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे असून, समितीत पुणे साखर आयुक्त (प्रशासन) संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व कोल्हापूर प्रादेशिक सह. संस्था साखर योगीराज सुर्वे यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने जागा विक्री निविदेस पुन्हा ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, या कालावधित निविदा दाखल न झाल्यास राज्य शासनास तसा अहवाल देणार आहे. यावर शासनच योग्य तो निर्णय घेईल, असे मत शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)समितीसमोर पेचप्रसंगकारखान्याने २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडले. त्याच्या रेखांकनाला महापालिकेची मान्यताही घेण्यात आली आहे. त्यानंतर समितीने जागा विक्रीची निविदा प्रसिद्ध करीत १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधित केवळ तीन प्लॉटसाठी तीन निविदा दाखल झाल्या. निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने समितीने प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीत नव्याने एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे समितीने पुन्हा एकदा २० नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. दुसऱ्या मुदतीत एकही निविदा दाखल झाली नसल्यामुळे जागा विक्री समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.