शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील मिरवणुकांमध्ये डॉल्बीला फाटा

By admin | Updated: September 28, 2015 23:44 IST

मध्यरात्रीपर्यंत विसर्जन : १७६ मंडळांच्या गणरायांना निरोप; पारंपरिक वाद्यांनी रंगत

सांगली : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ पुढच्या वर्षी लवकर याऽऽ’च्या जयघोषात भक्तिभावाने रविवारी अकराव्यादिवशी लाडक्या गणरायाला भक्तांनी निरोप दिला. डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत ढोल, ताशा, लेझीम, झांजपथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात सांगली शहरात निघालेल्या ‘श्रीं’च्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. शहर व परिसरातील १७६ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन केले. गणेश विसर्जनाच्या अकराव्यादिवशी सर्व गणेश मूर्र्तींचे विसर्जन केले जाते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरु केली होती. डॉल्बी बंदीमुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली होती. ढोल, ताशे, लेझीम व झांजपथकांनी परिसर दुमदुमून गेला होता. आकर्षक लेसर दिवे मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५०, विश्रामबाग १७, संजयनगर २४ व सांगली ग्रामीण हद्दीतील ८५ अशा एकूण १७६ मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.कॉलेज कॉर्नरवरील शहीद भगतसिंग, सावकार, राजवाडा चौक आदी मंडळांच्या ‘श्री’चे विसर्जन झाले. रात्री बारापर्यंत ध्वनिक्षेपक सुरु ठेवण्यास परवानगी असल्याने मिरवणुका उशिरापर्यंत सुरु होत्या. विसर्जनासाठी सरकारी घाटावर मध्यरात्रीपर्यंत मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी)‘आझाद’ची मिरवणूक लक्षवेधीखणभागातील ‘आझाद’ गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्यामुळे सोन्याचा मुलामा असलेली खास गणेशमूर्ती बनविण्यात आली होती. आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली होती. या गणेश मूर्तीचे नवव्यादिवशी विजर्सन झाले. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. खणभागातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मुलींचे झांजपथक, नाशिकचे ढोल, सैनिकांचा गणवेश परिधान केलेले मावळे हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणुकीत फेटे बांधलेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती. दहा घोडेही सहभागी झाले होते. मंडळाचे संस्थापक रामभाऊ घोडके, साहेबराव पानबुडे, अशोक कारंडे, मनोहर जाधव, दीपक पिराळे, अरुण कांबळे, गणपती कदम आदी उपस्थित होते. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती. पटेल चौकात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी मिरवणुकीस भेट दिली. मंडळाचे अध्यक्ष सागर घोडके, अमोल घोडके, नितीन नाईक, संजय आरगे, विजय घोडके, बटू घोडके, महेश घोडके, प्रशांत शिंदे आदींनी उत्सवाचे नियोजन केले होते.