शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णालये भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:23 IST

कोविड स्पेशल रेल्वेसाठी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने या रेल्वेगाड्यांची प्रशासनाने अद्याप मागणी केलेली नाही. देशात कोरोना संक्रमणामुळे रुग्णालये अपुरी ...

कोविड स्पेशल रेल्वेसाठी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्याने या रेल्वेगाड्यांची प्रशासनाने अद्याप मागणी केलेली नाही. देशात कोरोना संक्रमणामुळे रुग्णालये अपुरी पडल्यास रेल्वेतर्फे गतवर्षी ‘कोविड स्पेशल’ रेल्वे गाड्या तयार करण्यात आल्या आहेत. कोविड स्पेशलमध्ये रुग्णांसाठी ऑक्सिजन व इतर उपचार सुविधांची व्यवस्था आहे. स्थानिक प्रशासनाने मागणी केल्यास कोविड स्पेशल रेल्वे पाठविण्यात येणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षीही सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शासकीय कोविड रुग्णालयासह सांगली व मिरजेतील खासगी रुग्णालये फुल्ल असून, बाधितांच्या उपचारांसाठी नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. वाढत्या रुग्णसंख्येसाठी डॉक्टर, परिचारिका व उपचार सुविधा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांना उपचार मिळणे कठीण होत आहे.

त्यामुळे पुणे विभागाकडून कोविड स्पेशल रेल्वे गाड्या मिरजेत आणाव्यात यासाठी रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेकडे मागणी केल्यास कोविड स्पेशल गाड्या मिरजेत दाखल होण्याची शक्यता आहे. कोविड स्पेशल रेल्वेसाठी मिरजेत पाणी व ऑक्सिजन पुरवठ्याची सोय आहे. राज्य शासनाकडून मागणी झाल्यास कोविड स्पेशल रेल्वे मिरजेत पाठविण्यात येईल असे रेल्वेच्या पुणे विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोविड स्पेशल रेल्वेत रुग्णांवर उपचारांसाठी डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था स्थानिक प्रशासनाने करायची आहे. मात्र, डाॅक्टर व वैद्यकीय कर्मचारी अपुरे असल्याने अद्याप कोविड स्पेशलची मागणी करण्यात आलेली नाही.

चाैकट -

गतवर्षी मिरज स्थानकात एक कोविड स्पेशल रेल्वेगाडी पाठविण्यात आली होती. मात्र उपचारांसाठी वापर झाला नसल्याने श्रमिक स्पेशल म्हणून परप्रांतीय कामगारांना गावी पाठविण्यासाठी या रेल्वेचा वापर करण्यात आला होता. कोविड स्पेशल रेल्वेचा विलगीकरणासाठीही वापर करता येतो. मात्र, गतवर्षी व यावर्षीही रेल्वेच्या कोविड स्पेशलसाठी कोणत्याही जिल्ह्यात मागणी झाली नसल्याचे सांगण्यात आले.