शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

राजारामबापू व्याख्यानमालेच्या खर्चावरून वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

इस्लामपूर : राजारामबापू पाटील नगर व्याख्यानमालेच्या खर्चास मान्यता देण्याच्या विषयावरून सभागृहात दोन्ही बाजूंकडून जोरदार शेरेबाजी झाली. त्यामुळे वातावरण तापले ...

इस्लामपूर : राजारामबापू पाटील नगर व्याख्यानमालेच्या खर्चास मान्यता देण्याच्या विषयावरून सभागृहात दोन्ही बाजूंकडून जोरदार शेरेबाजी झाली. त्यामुळे वातावरण तापले होते. पेठ-सांगली रस्ता ते कोरे आप्पा घरापर्यंतच्या भूसंपादनासाठी बाधितांना तडजोडीने लाभ देण्याचा निर्णय झाला. तर शहरातील अतिक्रमणे काढून टाकण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सर्वाधिकार देण्यात आले.

येथील पालिकेच्या नाट्यगृहात १६ जानेवारी रोजी तहकूब झालेली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पुन्हा झाली. नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी निशिकांत भोसले-पाटील अध्यक्षस्थानी होते. मुख्याधिकारी अरविंद माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालिकेच्या राजारामबापू पाटील नगर व्याख्यानमालेसाठी झालेल्या खर्चाला मान्यता देण्याच्या विषयावर दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. या वेळी सुपारीबहाद्दर, उधळपट्टी, अवास्तव खर्च अशी शेरेबाजी परस्परांवर केली गेल्याने वातावरण तापले होते. मात्र नगराध्यक्ष पाटील यांनी सदस्यांना समज देत हे आक्षेपार्ह शब्द सभेच्या कामकाजातून काढून टाकल्याचे जाहीर केले. बऱ्याच वादावादीनंतर नगराध्यक्षांनी तीन लाख ५४ हजार रुपये खर्चाला मान्यता दिल्याचे जाहीर केले. तसेच नगर परिषदेच्या विविध विभागांसाठीच्या वार्षिक निविदा मागविण्यासाठीचा निर्णय झाला.

या सभेवेळी झालेल्या चर्चेत आनंदराव पवार, विक्रम पाटील, शकील सय्यद, वैभव पवार, अमित ओसवाल, सुप्रिया पाटील, प्रतिभा शिंदे, प्रदीप लोहार, संजय कोरे, शहाजी पाटील, विश्वनाथ डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, खंडेराव जाधव, डॉ. संग्राम पाटील, आनंदराव मलगुंडे, जयश्री माळी, संगीता कांबळे, सुनीता सपकाळ यांनी भाग घेतला.

चाैकट

पाणीपुरवठा धोरणाचा विषय वादळी

पालिकेकडून टॅँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत धोरण ठरविण्याच्या विषयावर वादळी चर्चा झाली. पालिकेचे ट्रॅक्टर आणि टॅँकर बदलण्याच्या स्थितीत आले आहेत. पाण्यापासून कोणाला अपाय होऊ नये, यासाठी स्टीलचे टॅँकर भाडेतत्त्वावर घेण्याचा विषय नगराध्यक्ष पाटील यांनी सभागृहासमोर ठेवला. या वेळी अनेक सदस्यांनी पाण्याचे दर न वाढविता नगरसेवकांचा अधिकार अबाधित ठेवून सुलभ पाणीपुरवठा करण्याचा आग्रह धरला. शेवटी हा विषय तहकूब करण्यात आला.