शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात स्वच्छ शहर सुंदर शहर अभियानास नागरिकांनी सहकार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST

आष्टा : आष्टा शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छ शहर सुंदर शहर अभियान राबविण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, परिसराची स्वच्छता राखावी, असे ...

आष्टा : आष्टा शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छ शहर सुंदर शहर अभियान राबविण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन वाळवा पंचायत समितीच्या माजी उपसभापती भाग्यश्री शिंदे यांनी केले.

आष्टा नगरपरिषेदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महिलांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी भाग्यश्री शिंदे बोलत होत्या. आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, महिला बालकल्याण सभापती शारदा खोत, उपसभापती पुष्पलता माळी, झीनत अत्तार, आसावरी सुतार, सारिका खोत, डॉ. प्रज्ञा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. कैलास चव्हाण म्हणाले, आष्टा पालिकेने राज्यात संत गाडगे बाबा अभियानात द्वितीय क्रमांक मिळविला होता. शहराचा देशात पुन्हा स्वच्छता अभियानात वरचा क्रमांक मिळविण्यासाठी पालिकेच्या विविध उपक्रमांना साथ द्यावी.

यावेळी आयडीबीआय बँकेच्यावतीने ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी डस्टबीन वाटप करण्यात आले. रोपाला जल अर्पण करून सुरुवात झाली. भारुडासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शारदा खोत यांनी स्वागत केले. आसावरी सुतार यांनी प्रास्ताविक केले, तर पुष्पलता माळी यांनी आभार मानले.

प्रतिभा पेटारे, लता पडळकर, संगीता सूर्यवंशी, मंगल सिद्ध, मनीषा जाधव, रुक्मिणी अवघडे, रागिनी सावंत, विमल थोटे, सारिका मदने, अर्जुन माने, सतीश माळी, शेरनवाब देवळे, अनिल बोंडे, सचिन मोरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

फोटो : २९०१२०२१-आयएसएलएम-आष्टा पालिका न्यूज

आष्टा पालिकेच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्यांचा गौरव भाग्यश्री शिंदे, नगराध्यक्ष स्नेहा माळी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तेजश्री बोंडे, झीनत आत्तार, शारदा खोत, पुष्पलता माळी, आसावरी सुतार, सारिका खोत, लता पडळकर, संगीता सूर्यवंशी, मनीषा जाधव उपस्थित हाेत्या.