शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:ची ओळख जाणून आवडीप्रमाणे क्षेत्र निवडा

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

अविनाश धर्माधिकारी : कासेगाव शिक्षण संस्थेच्या जयंत करिअर गाईडन्स सेंटरचे उद्घाटन

इस्लामपूर : प्रथम स्वत:ची ओळख करुन घेऊन क्षमता व आवडीप्रमाणे क्षेत्र निवडा़ मात्र जे क्षेत्र निवडाल, त्यामध्ये उत्तम व प्रतिभावंत बनण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला देऊन, विद्यार्थ्यांनी बुध्दिमत्तेचे मोजमाप गुणांच्या टक्केवारीत करणे ही चूक नव्हे, तर गंभीर बाब आहे, असा इशारा पुणे येथील माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी शुक्रवारी दिला़ येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या ‘जयंत करिअर फेअर’च्या उद्घाटन समारंभात धर्माधिकारी बोलत होते़ प्रारंभी माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते जयंत करिअर गाईडन्स सेंटर व जयंत करिअर फेअरचे उद्घाटन करण्यात आले़ तृप्ती पाटील (कापूसखेड) या मुलीस ड्रॉमधून मोफत प्रवेश देण्यात आला.धर्माधिकारी म्हणाले, एखादा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर झाली, दहावी, बारावीला उत्तम गुण मिळविले, म्हणजे तो अथवा ती बुध्दिमान, या ठोकळाबाज व्याख्येने आपण मुला-मुलींवर अन्याय करीत आहोत़ प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली चालत असते़ आमदार जयंत पाटील म्हणाले, जगात काहीही अशक्य नाही. फक्त निश्चित ध्येय व अचूक मार्गदर्शनाची गरज आहे़ करिअर गाईडन्स सेंटरच्या माध्यमातून ते आम्ही देणार आहोत़ संस्थेचे सचिव आऱ डी़ सावंत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. करिअर सेंटरचे संचालक एस़ पी़ यादव यांनी आभार मानले़ याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सदस्य टी़ ए़ चौगुले, व्ही़ डी़ माने, प्राचार्य विश्वास सायनाकर, सुहास पाटील, अ‍ॅड़ धैर्यशील पाटील, प्राचार्य राजेंद्र कुरळपकर, विलास काळे, सौ. प्रज्ञा घोरपडे, सुनील नवले, चंद्रकांत मगदूम, डॉ़ एऩ टी़ घट्टे, संदीप गिड्डे, संतोष पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)योग्यवेळी योग्य संधी गरजेची ॉयावेळी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, एखादा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर, इंजिनिअर झाली, दहावी, बारावीला उत्तम गुण मिळविले, म्हणजे तो अथवा ती बुध्दिमान, या ठोकळाबाज व्याख्येने आपण मुला-मुलींवर अन्याय करीत आहोत़ प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली चालत असते़ फक्त त्यांची आवड लक्षात घेऊन त्यांना त्या-त्या क्षेत्रात योग्यवेळी योग्य संधी मिळण्याची गरज असते.