जिल्हा परिषदेत बर्ड फ्लू जनजागृतीसाठी चिकन पार्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST2021-02-05T07:25:01+5:302021-02-05T07:25:01+5:30

जिल्हा परिषद पशुसंवर्धन आयोजित पार्टीत उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, शिक्षण सभापती आशा पाटील, राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांची ...

Chicken Party for Bird Flu Awareness in Zilla Parishad | जिल्हा परिषदेत बर्ड फ्लू जनजागृतीसाठी चिकन पार्टी

जिल्हा परिषदेत बर्ड फ्लू जनजागृतीसाठी चिकन पार्टी

जिल्हा परिषद पशुसंवर्धन आयोजित पार्टीत उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, शिक्षण सभापती आशा पाटील, राज्य पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग म्हणाले, राज्यातील कुक्कुटपालक शेतकरी आर्थिक नुकसानीपासून दूर राहील, यासाठीच राबविण्यात येत आहेत. बर्ड फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाय सुरक्षित आहेत. या रोगाचा मानवी संसर्ग नोंदविण्यात आलेला नाही. राज्यात आढळलेले नमुने देशी पक्ष्यांमध्ये असले तरी आहार, ताण, लसीकरण अनियमितता आणि कमी झालेली रोगप्रतिकारक क्षमता यांची जोड दिसून आलेली आहे. म्हणून घातक बर्ड फ्लू रोगाचा उद्रेक दिसून येत नाही. राज्यात विनाअडथळा सुरू असलेल्या व्यावसायिक कुक्कुट प्रक्षेत्रांना जैव सुरक्षेची संजीवनी १०० टक्के उपयुक्त ठरते. जैवसुरक्षिततेतून या बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यल्प आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे, निजाम मुलाणी, भगवान वाघमारे, आशा झिमूर, वैशाली माने, सहाय्यक पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते उपस्थित होते.

Web Title: Chicken Party for Bird Flu Awareness in Zilla Parishad