शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: अनैतिक संबंधातून सेंट्रिंग कामगाराचा खून, हल्लेखोर तिघे अल्पवयीन युवक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:22 IST

दोन-तीन तासांत छडा

सांगली : अनैतिक संबंधाच्या रागातून सेंट्रिंग कामगार दत्ता शरणाप्पा सुतार (वय ३०, मूळ रा. इंदिरानगर, सध्या रा. शिवशंभो चौक) याचा तिघा अल्पवयीन युवकांनी एडक्याने वार करून निर्घृण खून केला. सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर हा प्रकार घडला. हल्ल्यावेळी दत्ताचा मित्र अतुल दत्तात्रय ठोंबरे (रा. शिवशंभो चौक) हा आपल्याला देखील मारतील म्हणून पळून गेला. सांगली शहर पोलिसांनी अवघ्या दोन-तीन तासांत खुनाचा छडा लावला. तिघांना ताब्यात घेतले.पोलिसांच्या माहितीनुसार मृत दत्ता सुतार हा सेंट्रिंग कामगार म्हणून सळ्या बांधण्याचे काम करत होता. त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुली आहेत. कुटुंबासह तो इंदिरानगर परिसरात राहत होता. त्याला दारूचे व्यसनही होते. कोरोना लॉकडाऊनच्या काळात एका महिलेशी अनैतिक संबंध जुळून आले. ती महिला अल्पवयीन मुलासह राहत होती. दत्ता याच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीने त्याला जाब विचारला. पत्नीशी सतत वाद होऊ लागला. त्यामुळे तो गेली दीड ते दोन वर्षे महिलेच्या घरातच तिच्या मुलासह शिवशंभो चौक परिसरात राहत होता.दत्ता सुतार हा फारसा कामधंदा करत नव्हता. महिलेचा मुलगा लहान असल्यामुळे सुरुवातीला त्याला समज नव्हती; परंतु नंतर आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध पाहून मुलाला दत्ताचा राग येत होता. बरेच दिवस तो राग सहन करून थांबला होता. गुरुवारी दुपारी तो दोन अल्पवयीन साथीदारांसह कदमवाडी परिसरात घोडी चरायला घेऊन गेला होता. त्यावेळी त्याने दत्ताला पैसे पाहिजेत म्हणून कदमवाडी रस्त्यावर बोलवून घेतले.नशेत असलेला दत्ता त्याचा मित्र अतुल ठोंबरे याला घेऊन कदमवाडीकडे दुपारी दीडच्या सुमारास दुचाकी (एमएच ०९ बीक्यू ४९८५) वरून निघाला. वाटेत तिघे अल्पवयीन युवक थांबलेले दिसले. अतुलने गाडी थांबवल्यानंतर मागे बसलेला दत्ता उतरला. तो खाली उतरताच तिघांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हल्ला पाहून मित्र अतुल पळून गेला. छातीवर दगड मारताच दत्ता खाली पडला. तेव्हा एडक्याने दत्ताच्या चेहऱ्यावर व डोक्यावर वार करताच तो जागीच मृत झाला.फारसी वर्दळ नसलेल्या रस्त्यावर खून केल्यानंतर तेवढ्यात एक दुचाकीस्वार रस्त्यावरून येताना दिसताच तिघे युवक कदमवाडीकडे पळाले. खुनाची माहिती मिळताच उपअधीक्षक विमला एम., शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, गौतम कांबळे, संतोष गळवे, योगेश सटाले आदींसह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत दत्ताचा मित्र अतुल ठोंबरे याने खुनाबाबत फिर्याद दिली आहे.

दोन-तीन तासांत छडाएका दुचाकीस्वाराने शहर पोलिसांना खुनाची माहिती देताच पोलिस निरीक्षक संजय मोरे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत दत्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्याजवळ एक कोयता व बाजूलाच चाकू पडला होता. तसेच दुचाकीही तेथेच होती. मृताजवळ ओळखीचा पुरावा नव्हता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा मृताची ओळख पटली. त्यानंतर संशयितांची नावे निष्पन्न झाली. त्यांनाही तत्काळ ताब्यात घेतले.

तिघांकडून खुनाची कबुलीदत्ता सुतार याचा खून करणाऱ्या तिघा संशयित युवकांना पोलिसांनी काही वेळातच ताब्यात घेतले. चौकशीत एकाने त्याच्या आईबरोबर दत्ताचे अनैतिक संबंध होते. त्या रागातून दोघा साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. पोलिस तपासात तिघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस