शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत भांडवली घरपट्टीचा प्रवेश

By admin | Updated: September 15, 2014 23:13 IST

सूचना प्रसिद्ध : प्रक्रिया सुरू, छोट्या घरांसह नव्या बांधकामांना मिळणार दिलासा

सांगली : भाडेमूल्यावर आधारित घरपट्टीची शेवटची बिले तयार केली जात असतानाच, भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीची प्रक्रियाही आता सुरू झाली आहे. पुढील वर्षात याची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने महापालिकेची पावले पडत आहेत. नगरपालिका कालावधित बांधलेल्या व ज्यांना अत्यंत कमी घरपट्टी आहे अशा मालमत्तांची घरपट्टी वाढणार असून, नव्या बांधकामांना यापूर्वीच वाढीव घरपट्टी लागू झाल्याने त्यांना या करप्रणालीतून दिलासा मिळणार आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीबाबत आज, सोमवारी महापालिकेने नोटीस प्रसिद्ध केली. यामध्ये त्यांनी नव्या करप्रणालीची पूर्वकल्पना दिली आहे. महाआघाडीच्या कालावधित २ आॅगस्ट २0१0 या कालावधित महापालिका व राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार झाला होता. या करारानुसार पाणीपट्टी, जलनिस्सारण, घरपट्टी, मालमत्ता विभागांच्या सेवांचे दर व सेवाशुल्कात १५ ते २0 टक्के दरवाढीची अट महापालिकेने मान्य केली आहे. त्यामध्ये भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचाही समावेश आहे. यासंदर्भात १ जून २0१३ रोजी महापालिकेने याचा ठरावही केला आहे. यापूर्वी भाडेमूल्यावर आधारित घरपट्टी होती. या जुन्या करप्रणालीत अनेक त्रुटी होत्या. एकाच भागात असलेल्या काही घरांना अडीच हजारावर घरपट्टी असताना, शेजारील खूप जुन्या इमारतीला दोनशे किंवा तीनशे रुपये घरपट्टी आकारली जात होती. त्यामुळेच आता नव्या करप्रणालीची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिका क्षेत्रातील घरपट्टीत मोठी वाढ झाली आहे. त्यावेळी नागरिकांनी या करवाढीस विरोध केला होता. तरीही महापालिकेने करआकारणी सुरूच ठेवली. महापालिकेच्या स्थापनेपासूनच येथील घरपट्टी अन्य महापालिकांच्या तुलनेत अधिक असल्याची ओरड होत होती. त्यात काहीअंशी तथ्यही होते. मात्र, काही मालमत्तांना कमी कर आकारणी व नव्या मालमत्तांना अधिक कर लावण्यात आला होता. करामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आता भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी लागू केली जाणार आहे. ज्यांची घरपट्टी गेल्या काही वर्षात भरमसाट वाढली, त्यांची घरपट्टी काहीअंशी कमी होण्याची चिन्हे आहेत. जुन्या व कमी कर भरणाऱ्या मालमत्तांना आता अन्य मालमत्तांप्रमाणे कर भरावा लागणार आहे. प्रत्यक्ष करप्रणाली सुरू झाल्यानंतर याचे परिणाम समोर येतील. (प्रतिनिधी)लहान घरांना दिलासापाचशे चौरस फुटांपेक्षा कमी आकाराच्या घरांना नवी करप्रणाली लागू होणार नाही. त्यामुळे अशा घरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाचशे फुटांपेक्षा अधिकच्या घरांना त्या त्या क्षेत्रातील रेडिरेकनर दराप्रमाणे भारांक निश्चित करून घरपट्टी आकारली जाणार आहे. यंदा जुनीच पद्धतयावर्षी काढली जाणारी घरपट्टीची बिले जुन्या पद्धतीने भाडेमूल्यावर आधारित असणार आहेत. आॅक्टोबर महिन्यात त्याबाबतच्या नोटिसा दिल्या जाणार आहेत. असे काढले जाते भांडवली मूल्यएकूण बांधकाम क्षेत्र Ÿ रेडीरेकनर Ÿ इमारतीचे स्वरुप Ÿ मजला भारांक Ÿ बांधकामाच्या वयाचा भारांक, या गणितातून येणारे उत्तर म्हणजे त्या मालमत्तेचे भांडवली मूल्य. या भांडवली मूल्यास निश्चित केलेल्या भारांकाच्या टक्केवारीने पुन्हा गुणले जाणार आहे. त्यातून घरपट्टी निश्चित केली जाईल. प्रस्तावित भारांक सध्या 0.२५ इतका आहे. त्याचा विचार केल्यास ३0 लाखांच्या भांडवली मूल्याच्या बांधकामास अंदाजे ३ हजार ७६६ रुपये घरपट्टी आकारली जाईल. सामान्य कर, भांडवली मूल्य आणि पाणीपुरवठा लाभ कर अशा उपकरांच्या भारांक निश्चितीवर घरपट्टीचा आकडा कमी-जास्त होऊ शकतो. परंतु या गणितात फारसा फरक पडणार नाही.