शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशांच्या जहाजाला ‘शिराळा’ नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुक्यातील निसर्ग साैंदर्य, शेती, धार्मिक परंपरा, स्वातंत्र्याचा इतिहास याची सर्वत्र ख्याती आहे. ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : शिराळा तालुक्यातील निसर्ग साैंदर्य, शेती, धार्मिक परंपरा, स्वातंत्र्याचा इतिहास याची सर्वत्र ख्याती आहे. ती ब्रिटिश काळातही होती. ती जगभर व्हावी म्हणूनच याची ब्रिटिश सरकारने ‘शिराळा’ या नावाने एक प्रवासी व मालवाहतूक जहाज बनविले होते. हे जहाज म्हणजे शिराळ्याचा शिरपेचात एक मानाचा तुरा म्हणावा लागेल.

ए. ए. आणि जे. इंग्लिस, ग्लासगो यांनी १९०१ मध्ये ‘शिराळा’ नावाने एक मोठे जहाज बनविले होते. ज्यावेळी या जहाजाचा नाश झाला त्यावेळी ब्रिटिश इंडिया स्टीम नेव्हिगेशन लिमिटेड कंपनीची या जहाजावर मालकी होती.

२ जुलै १९१८ रोजी शिराळा जहाज लंडन ते मुंबई प्रवास करीत होते. त्यामध्ये २१३ प्रवासी आणि पाच हजार टन माल होता. यावेळी जोहान्स लोहच्या आदेशाखाली जर्मन यू-बोटीने ‘शिराळा’ जहाजास बुडविले. त्यावेळी ५३०६ टन ब्रिटिश स्टीमर ओव्हर्स लाइटवेसलपासून काही मैलांवर होता. या दुर्घटनेत जहाजातील आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

१९०१ मध्ये स्टीलची बांधणी असणारे ते वाफेवर चालणारे जहाज होते. या जहाजावर ‘शिराळा’ हे नाव ही नोंदविलेले आढळून आले आहे. सध्या इंग्लंड येथे हे जहाज स्कुबा ड्रायव्हिंगसाठी वापरत आहेत. या जहाजाची लांबी ४५१ फूट, रुंदी ५७ फूट ६ इंच खोली ३६ फूट ७६ इंच होती. प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांसाठी निवास व्यवस्था होती. प्रवाशांच्या कारसाठी सार्वजनिक खोल्या मोठ्या संख्येने आणि त्यात क्लास स्मोक रूम, फर्स्ट क्लास सलून, सेकंड क्लास लाऊंज, स्मोक रूम आणि सेकंड क्लास सलूनचा समावेश होता.

कोट

पी अँड ओ हेरिटेज या कंपनीने जहाजाद्वारे भारताला जगाशी जोडण्याचे काम केले. या जहाजांना इंग्रजांच्या भाषेत नावे न देता ज्या क्षेत्रात काम करीत होते त्याची नावे जहाजाला दिली आहेत. त्यातील एक नाव ‘शिराळा’ हे आहे. अशा नावांमुळे नागरिकांना आपलेपणा वाटावा हा हेतू होता.

- संजय सहस्त्रबुद्धे , दिब्रुगढ, आसाम, भारतीय नावीक विषयाचे अभ्यासक