शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:15 IST

विरोधी काँग्रेसकडून निवडणुकीतून माघार

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीत बुधवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. महापौरपदासाठी भाजपचे धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नगरसेवक गजानन मगदूम यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानंतर दोघांनीही अर्ज दाखल केले. ऐनवेळी विरोधी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली. आता निवडीची अधिकृत घोषणा १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. सकाळी भाजप व राष्ट्रवादीच्या नेते, नगरसेवकांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा केली. भाजपच्यावतीने महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी व उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोघांच्या नावाची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली. त्यानंतर दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.

विरोधी काँग्रेसकडूनही अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरू होत्या. खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी नगरसेवकांशी चर्चा केली. याचवेळी भाजप नेत्यांनीही काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला. सध्या महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाने वेगळ्या स्थितीतून जात असून निवडणूक टाळण्याची विनंती केली. त्याला काँग्रेस नेत्यांनीही सहमती दर्शविली. अखेर महापौर व उपमहापौरपदासाठी सूर्यवंशी व मगदूम यांचेच दोन अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले असून अधिकृत घोषणा १० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhiraj Suryavanshi Unopposed as Sangli Mayor, Gajanan Magdum Deputy

Web Summary : BJP's Dhiraj Suryavanshi elected Sangli's mayor unopposed; NCP's Gajanan Magdum is deputy. Congress withdrew, ensuring uncontested election. Official announcement on February 10th.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस