शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

चांगल्या राज्यकर्त्यांसाठीही जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:24 IST

ओळ : मिरजेत सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी, बलवडी येथील क्रांती स्मृतिवनाचे संस्थापक संपतराव पवार, उपायुक्त ...

ओळ : मिरजेत सुधार समिती कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार राजू शेट्टी, बलवडी येथील क्रांती स्मृतिवनाचे संस्थापक संपतराव पवार, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते झाले.

----------------------------------------

मिरज : देशातील शेतकरी आंदोलन व अराजकतेचे वातावरण हे राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे द्योतक आहे. चांगले राज्यकर्ते घडविण्यासाठीही आता जनजागृतीची गरज निर्माण झाली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. मिरजेत शहर सुधार समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शेट्टी यांनी केले. यावेळी बलवडी येथील क्रांती स्मृतिवनचे संपतराव पवार प्रमुख पाहुणे होते.

राजू शेट्टी म्हणाले, सध्या देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरीविरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी शेतकरी शंभर दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. मात्र, याची काेणतीही काळजी राज्यकर्त्यांना नाही. शेतकऱ्यांना मान्य नाहीत असे कायदे करण्याची राज्यकर्त्यांना इतकी घाई कशासाठी आहे? हे जनतेला कळून चुकले आहे. लोकशाहीत आंदोलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, पंतप्रधान व गृहमंत्री शेतकरी आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास लोकशाही धोक्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

संपतराव पवार म्हणाले, शहराच्या वेगाने वाढणाऱ्या विस्तारीकरणामुळे नागरी समस्या उग्ररूप धारण करीत आहेत. यातूनच सुधार समितीसारख्या सामाजिक संघटनांचा उदय होत आहे. रोजगारासाठी शहरांकडे येणाऱ्या मजूर, कामगारांच्या लोंढ्यामुळे शहरांचे बकाल स्वरूप पाहता खेडी स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.

समितीचे संस्थापक अ‍ॅड. ए. ए. काझी यांनी प्रास्ताविक केले. रूपाली गाडवे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, काजा ट्रेडिंगचे कुमार पी. एम., सहायक पोलीस निरीक्षक अनिल माने, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, नगरसेवक आनंदा देवमाने, संजय मेंंढे, नगरसेविका डॉ. नर्गिस सय्यद, अय्याज नायकवडी, सज्जाद भोकरे, विवेक शेटे, विलास देसाई, मिलिंद खाडीलकर, पीर काझी, मौला कुरणे, राकेश कोळेकर, शकील पीरजादे, महेंद्र गाडे, महेश चौगुले, समितीचे अध्यक्ष जावेद पटेल, बाळासाहेब पाटील, गीतांजली पाटील, मुस्तफा बुजरूक, शंकर परदेशी, संतोष माने, श्रीकांत महाजन, जहीर मुजावर उपस्थित होते.