शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतीमधून माथाडी कायदा हद्दपारसाठी प्रयत्नशील

By admin | Updated: May 23, 2015 00:28 IST

सतीश मालू : प्रचार प्रारंभाने ‘कृष्णा व्हॅली’च्या निवडणुकीत रंगत

कुपवाड : उद्योजकांसाठी त्रासदायक असलेला माथाडी कायदा कुपवाड औद्योगिक वसाहतीसह इतर वसाहतींमधून हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स स्वाभिमानी उद्योजक व्यापारी एकता पॅनेलचे प्रमुख सतीश मालू यांनी पॅनेलच्या प्रचार प्रारंभप्रसंगी व्यक्त केले. पॅनेलचा प्रचार प्रारंभ समृध्दी इंडस्ट्रीजचे मालक ओमप्रकाश मालू यांच्याहस्ते करण्यात आला. कुपवाड एमआयडीसीतील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स या उद्योजक संघटनेच्या इतिहासात प्रथमच निवडणूक होत आहे. बारा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी ‘स्वाभिमानी उद्योजक व्यापारी एकता पॅनेल’ आणि ‘उद्योग विकास आघाडी’ अशी दोन पॅनेल निवडणुकीच्या रणांगणात उतरली आहेत. स्वाभिमानी या सत्ताधारी पॅनेलची जबाबदारी पॅनेलप्रमुख सतीश मालू व शिवाजी पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे, तर विरोधी असलेल्या उद्योग विकास आघाडीची जबाबदारी अशोक कोठावळे व डी. के. चौगुले यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत चांगलीच वाढली असून कृष्णा व्हॅली चेंबरची दोन्ही पॅनेल जोरदार प्रयत्न करीत आहेत. यावेळी उमेदवार चंद्रकांत पाटील, शिवाजी पाटील, सतीश मालू, दीपक मर्दा, जयपाल चिंचवाडे, हरी गुरव, रतिलाल पटेल, गुंडू एरंडोले, रमेश आरवाडे, पांडुरंग रूपनर, अनंत चिमड, विपुल शहा उपस्थित होते. (वार्ताहर) उद्योजकांच्या गाठीभेटीसाठी धावपळ...एमआयडीसीमध्ये प्रथमच निवडणूक होत आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या निवडणुकीकडे लागल्या आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधी दोन्ही पॅनेलच्या प्रचार प्रारंभानंतर उमेदवारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. उद्योजकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे सध्या निवडणुकीसाठी उभारलेले उमेदवार उद्योग संभाळत मतदारांच्या गाठीभेटीवर भर देत असल्याने, धावपळ उडाली आहे.