शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

शिराळा : राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १४४ कोटी रुपये वेतन अनुदान मंजूर झाले आहे. आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे विविध ...

शिराळा : राज्यातील आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी १४४ कोटी रुपये वेतन अनुदान मंजूर झाले आहे. आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्‍न तसेच वेतन अनुदान याबाबत इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत स्वराज्य शिक्षक संघाच्या वतीने आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडले होते. त्याची दखल घेत हे अनुदान तात्काळ मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार यांनी दिली.

ते म्हणाले, जिल्हा व प्रादेशिक स्तरावर सामाजिक न्याय विभागाचे कर्मचारी असल्याने कामकाजात सुसूत्रता येत नाही. त्यामुळे लवकरच जिल्हा व प्रादेशिक स्तरावर बहुजन कल्याण विभागाचे स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त करून स्वतंत्ररीत्या कारभार सुरू होणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयाला दोन शिक्षक वाढवून देण्याचे प्रस्ताव लवकरच मंजूर करण्यात येतील. तसेच रिक्त पदावर व नवीन मंजूर पदाला नियुक्ती देण्यासाठी वित्त विभागाची परवानगी घेऊन लवकरच पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात येईल. काही पदाच्या वेतनश्रेणीतील विसंगतीदेखील दुरुस्त करण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालयाला प्राथमिक व माध्यमिकप्रमाणेच इमारत भाडे लवकरच मंजूर करण्यात येईल. त्याचबरोबर प्राथमिक विभागास सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर आठ टक्के वेतनेतर अनुदान मंजूर करण्यात येणार आहे.

या बैठकीला आमदार विक्रम काळे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार मंगेश चव्हाण, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, प्रदेश समन्वयक राजेंद्र बेस्के व प्रदेश सहसरचिटणीस राजेंद्र जगताप उपस्थित होते.