शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

कवठेएकंद : पुस्तकाचा संबंध मस्तकाशी असतो. मस्तक ठीक असले की नतमस्तक व्हावे लागत नाही. जगाच्या पाठीवर शिक्षणाला महत्त्व आहे. ...

कवठेएकंद : पुस्तकाचा संबंध मस्तकाशी असतो. मस्तक ठीक असले की नतमस्तक व्हावे लागत नाही. जगाच्या पाठीवर शिक्षणाला महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीची जपणूक नव्या पिढीने केली पाहिजे. संस्कृती जपण्यासाठी आधुनिकता जोपासावी, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी येथे केले.

कवठेएकंद (ता. तासगाव) येथील क्रांतिसिंह नाना पाटील ज्ञानप्रबोधिनी सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन, तैलचित्र अनावरण, वास्तू अर्पण सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, शेकापच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष चित्रलेखा पाटील, डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या उपस्थितीत सुषमा पाटील स्मृती सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, खेड्यांचा विकास व्हायचा असेल तर शेती सुधारली पाहिजे. शेतीमध्ये तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी केला पाहिजे. शेतीत क्षारपड सुधारणेचा प्रश्न समोर येत आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. कवठे एकंदच्या शेती व सामाजिक क्षेत्राने बरीच प्रगती केली आहे. सुषमा पाटील यांचे कार्य प्रेरणादायी आहे. गावच्या लोकांनी केलेला सत्कार माझ्यासाठी मौलिक आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी ‘कृषी पारायण’ संकल्पना शेटफळे या गावातून सुरू होत आहे. शासकीय व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करा.

जयंत पाटील म्हणाले, गावं आता बदलू लागली आहेत. वाचनालयाने ही आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट यांसारख्या सोयी उपलब्ध कराव्यात. वाचन संस्कृती सुधारली पाहिजे. युवकांनी समाजकारणात सक्रिय व्हावे.

यावेळी देणगीदार विजयराव पाटील यांना गौरवपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बाबूराव लगारे यांनी प्रास्ताविक केले. राजाराम माळी यांनी स्वागत केले. संदीप नागजे, संदीप कांबळे, जावेद जमादार यांनी सूत्रसंचालन केले. संजय थोरात यांनी आभार मानले.