शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आष्ट्यात टेंडरवरून ‘राष्ट्रवादी’-भाजप पदाधिकारी भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:21 IST

नगरपरिषदेतच शिवीगाळ करत अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार

आष्टा : आष्टा शहरात मंजूर टेंडरवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम जाधव व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांच्यात नगरपरिषदेतच दोघांमध्ये शिवीगाळ होऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार यावेळी घडला. आष्टा नगरपरिषदेच्या आवारात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमा झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली.

आष्टा नगरपालिकेच्यावतीने आष्टा शहरात वार्षिक रस्ते विकास नफा-तोटा निधी योजनेच्या माध्यमातून बोळ, रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्यांचे खडीकरण या कामांची निविदा प्रक्रिया राबविली. ठेकेदारांनी बयाणा रक्कम भरून टेंडर फॉर्म भरला. मात्र त्यावर ठेकेदार मुसळे यांच्यावतीने मोहन तावदर हे नाव व मोबाईल नंबर भरण्यास बाहेर आले असता, एका राजकीय पक्षाच्या काहीजणांनी दमदाटी करून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले व टेंडर फॉर्म जमा करण्याची वेळ संपल्यानंतर सोडून दिले.

यावेळी युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, अमित ढोले, राजकेदार आटुगडे, महेश पाटील, अमोल अवघडे, गुंडाभाऊ मस्के, अभिजित वग्यानी, कपिल कदम कुणाल काळोखे आदींनी नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांना निवेदन दिले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बिहार राज्याप्रमाणे आष्टा शहरात दडपशाही केली आहे. प्रशासनाने निविदा प्रक्रिया निकोप पद्धतीने राबवायला हवी होती. प्रशासनाने तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा निकोप पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत -संग्राम जाधव, अध्यक्ष , युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
 

आमच्याकडून कोणालाही मारहाण झालेली नाही. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. - प्रवीण माने, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा

टॅग्स :SangliसांगलीNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपाPoliticsराजकारण