शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: साळिंदराच्या सुटकेसाठी मध्यरात्री साडेचार तासांचे ‘रेस्क्यू ऑपरेशन’; ड्रिल मशीनने नाला फोडून दिलं जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 12:23 IST

बचावकार्यात वनरक्षक व प्राणीमित्र जखमी

शिराळा : कुत्र्यांच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी पळत सुटलेले साळिंदर वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथील एका बंदिस्त नाल्यात अडकले. शुक्रवारी (दि. १८) रात्री १० वाजता सुरू झालेले हे थरारनाट्य पहाटे अडीच वाजता संपले. वनविभाग आणि प्राणिमित्रांनी साडेचार तास शर्थीचे प्रयत्न करत, ड्रिल मशीनने काँक्रिटचा नाला फोडून या मुक्या जीवाला जीवनदान दिले. या बचावकार्यात साळिंदराचे काटे लागल्याने दोघे जण जखमी झाले.याबाबत माहिती अशी, शुक्रवारी रात्री काही कुत्रे एका साळिंदराच्या शिकारीसाठी मागे लागले होते. जीव वाचवण्यासाठी हे साळिंदर सैरावैरा पळत सुटले आणि गावातील तीस फूट लांबीच्या बंदिस्त नाल्यात शिरले. मात्र, नाल्यात गाळ अधिक असल्याने आणि नाला अरुंद असल्याने ते आतमध्येच अडकून पडले. ही बाब लक्षात येताच प्राणिमित्र आणि वनविभागाला पाचारण केले.रात्री दहाच्या सुमारास बचावकार्याला सुरुवात झाली. नाला काँक्रिटचा आणि अरुंद असल्याने साळिंदराला बाहेर काढण्यात अडथळे येत होते. अखेर, रात्री उशिरा ड्रिल मशीन आणि घणाच्या साहाय्याने नाला फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. काळजीपूर्वक नाला फोडून, साळिंदराला कोणतीही इजा न होऊ देता बाहेर काढले. पहाटे अडीच वाजता या थरारक बचावकार्याला यश आले. या संपूर्ण मोहिमेत वनरक्षक दत्तात्रय शिंदे आणि प्राणिमित्र धीरज गायकवाड यांना साळिंदराचे काटे लागल्याने ते जखमी झाले. वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल वाजे, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स प्राणिमित्र धीरज गायकवाड, पंकज कदम, सुभाष पाटील, मारुती पाटील यांनी हे बचावकार्य यशस्वी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सुखरूप बाहेर काढलेल्या या साळिंदराला नंतर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.

शिराळा व वाळवा तालुक्यांत वन्यप्राणी व वन्यजीव यांचा जास्त प्रादुर्भाव आहे. त्यांना रेस्क्यू करताना पकडण्यासाठी अत्याधुनिक साहित्य तसेच प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. हे साहित्य मिळाल्यास वन्यप्राणी व वन्यजीव यांचे चांगल्या पद्धतीने त्यांना जखम न होता सुखरूप सुटका करता येईल. - सुशीलकुमार गायकवाड, संस्थापक ,सह्याद्री रेस्क्यू वॉरियर्स.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Porcupine Rescued After Midnight Rescue Operation; Life Saved

Web Summary : A porcupine, fleeing dogs, got trapped in a drain in Sangli. After a 4.5-hour rescue, rescuers drilled through concrete, saving it. Two were injured by its quills. The porcupine was released back into its natural habitat.