शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीवर कोणाचा पडदा?, सांगली जिल्ह्यात पाच दिवसाला एकाचा मुडदा; ११ महिन्यांत ६० खून

By घनशाम नवाथे | Updated: November 13, 2025 19:24 IST

वाढत्या खुनाच्या घटनांनी पोलिस हादरले, नागरिक घाबरले

घनशाम नवाथे सांगली : नशेखोरी, पूर्ववैमनस्य आणि वैयक्तिक वादातून यंदाच्या वर्षात एक दोन नव्हे, तर तब्बल ६० खून झाले आहे. यंदाच्या वर्षात खुनाच्या वाढत्या घटनांनी पोलिसही हादरले आहेत. पाच दिवसाला एक खून होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी कुपवाड, इस्लामपूर खून सत्राने चर्चेत आले होते, परंतु सांगली परिसरात महिनाभरात पाच खून झाल्याने खळबळ उडाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईचा परिणाम म्हणून खून वगळता इतर गुन्ह्याचे प्रमाण यंदाच्या वर्षात घटले, परंतु दुसरीकडे खुनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात पाच दिवसाला एक खून असे प्रमाण दिसून येत होते. चार महिन्यांनंतर हे प्रमाण कमी झालेले नाही. सद्यस्थितीत पाच दिवसाला एकाचा मुडदा पाडला जात आहे. खुनाची कारणे वेगवेगळी असली, तरी वाढते प्रमाण निश्चितच चिंताजनक आहे.यंदाच्या वर्षात आजअखेर तब्बल ६० जणांचा खून झाला आहे, तर खुनी हल्ल्याच्या घटनाही जवळपास तेवढ्याच आहेत. अकरा महिन्यांत ६० जणांचा खून झाल्याचे प्रमाण निश्चितच पोलिस दलाला इशारा देण्याइतपत गंभीर म्हणावे लागेल. पाच दिवसाला एक खून होत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या खुनातील आरोपींना पकडले असले, तरी या खुनाच्या घटनांमुळे गुन्हेगारीत भर पडली आहे. गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे.११ महिन्यांत तब्बल ६० खून झाल्यामुळे पोलिसांना आता याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. ६० खुनांपैकी जवळपास १८ ते २० खून हे वर्चस्ववाद, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारी यातून झाले आहेत, तर इतर खून हे वैयक्तिक कारणातून झाले आहेत. वैयक्तिक कारणातून होणारे खून रोखणे पोलिसांच्या हातात नसले, तरी वर्चस्ववाद, टोळीयुद्ध आणि गुन्हेगारीतून होणारे खून रोखण्याचे पोलिस दलासमोर आव्हान उभे राहिले आहे.

नशेखोरीने गुन्हे वाढलेदारू, गांजा, नशेच्या गोळ्यांचा वापर यामुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. अनेक गुन्हेगार नशेच्या गोळ्या घेऊन गुन्हा करण्याचे धाडस करतात, असे काही खुनाच्या घटनांवरून दिसून येत आहे. वाढती नशेखोरी आणि गुन्हेगारी असे समीकरण निर्माण झाले आहे. पोलिस कारवाईनंतरही नशेखोरी अद्याप थांबलेली नाही.

सांगलीत महिन्यात पाच खूनसांगलीत दारूच्या नशेत औद्योगिक वसाहत, शंभरफुटी रस्त्यावरील व्हाइट हाउस बार, पोलिस चौकीसमोरील तबेला येथे खून झाले, तसेच सिव्हिल हॉस्पिटलजवळील गारपीर चौकातील दोघांचा खून असे पाच खून झाले आहेत. महिनाभरात पाच जणांचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.

सर्रास शस्त्रांचा वापरगेल्या काही महिन्यांत कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर करून खुनासाठी केला जात आहे. कोयता कोठेही सहजपणे रस्त्यावरही विकला जातो. सहज मिळत असल्यामुळे त्याचा खून करण्यासाठी वापर केला जात आहे, तसेच ऑनलाइन व कोठेही सहज मिळणाऱ्या चाकूचा गुन्ह्यातील वापर धोकादायक ठरत आहे.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे दुर्लक्षपोलिस ठाणेअंतर्गत स्थापन केलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखा (डीबी)ची कारवाई अपवाद वगळता प्रभावी ठरत नाही. केवळ सिव्हिल गणवेशात अनेक पोलिस कर्मचारी हद्दीमध्ये मिरवतात. हद्दीतील गुन्हेगारांच्या कारवायांना वेळीच आवर घालण्यासाठी डीबीने आक्रमक होण्याची गरज आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशतखून, खुनी हल्ला, गंभीर दुखापत अशा गुन्ह्यात सहभाग असलेल्या गुन्हेगारांनी सांगली परिसरात दहशत निर्माण केली आहे. कायद्यातील पळवाटा शोधून गुन्ह्यातील सुटलेल्या मोकाट गुन्हेगारांनी पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे काही भागात दिसून येते. पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नाही.

कायद्याचा धाक हवागुन्हेगारांना सतत कायद्याच्या कचाट्यात पकडून ठेवणे हाच गुन्हेगारी रोखण्याचा प्रभावी मार्ग असू शकतो. सतत प्रतिबंधात्मक कारवाईखाली गुन्हेगारांना जखडून ठेवल्यास गुन्हेगारी कारवायांना पायबंद बसू शकतो. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli gripped by crime wave: A murder every five days.

Web Summary : Sangli district is facing a surge in murders, with 60 killings in eleven months. Police attribute the rise to gang wars, personal disputes, and drug abuse. Easy access to weapons and ineffective crime prevention are exacerbating the situation, causing widespread fear.