शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शहरातील ५५० मिळकत पत्रिका गायब

By अशोक डोंबाळे | Updated: April 11, 2025 18:18 IST

तत्कालीन अधिकाऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार : नवीन मिळकत पत्रिका संबंधितांना कधी मिळणार?

अशोक डोंबाळेसांगली : सांगली शहरातील सिटी सर्व्हेच्या सुमारे ५५० मिळकत पत्रिका मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत तत्कालीन अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. परंतु नवीन मिळकत पत्रिका तयार करण्याबाबत अद्याप कोणतेही प्रयोजन करण्यात आले नसल्याने मिळकतीधारक चिंतेत आहेत. संबंधित मिळकत पत्रिकाधारकांना नवीन मिळकत पत्रिका कधी मिळणार, असाही प्रश्न शहरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

नगर भूमापन कार्यालयातील काही वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कारभारामुळे नगर भूमापन कार्यालयातील ५५० मिळकत पत्रिका मिळत नाहीत. तत्कालीन तिघा अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई न करता जबाबदारी झटकून निघून गेले. कार्यकाल संपवून त्या अधिकाऱ्यांच्या अन्य ठिकाणी बदल्या झाल्या आहेत. परंतु नवीन आलेले अधिकारी सांगली शहरातील ५५० मिळकत पत्रिकांचा शोध लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मिळकत पत्रिका मिळत नसल्याच्या गोंधळाबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी त्या म्हणाल्या, मिळकत पत्रिका जुन्या असल्यामुळे काही मिळकत पत्रिकांबाबत गोंधळ आहे. काही मिळकत पत्रिकांवर क्षेत्र नाही, तर काहींवर नावच नाहीत. यामध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे. नवीन मिळकत पत्रिका देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत.

नवीन मिळकत पत्रिकांचे काम सुरू..१९२८ पासूनच्या मिळकत पत्रिका आहेत. जुन्या असल्यामुळे त्या मिळकत पत्रिकांवर काही ठिकाणी नावच नाहीत. तसेच काही ठिकाणी मिळकत पत्रिकावर क्षेत्र नाही. हा सर्व गोंधळ ऑनलाईनमुळे उघडकीस आला आहे. सांगली शहरात एकूण ३० हजारांपर्यंत मिळकत पत्रिका असून त्यामध्ये ५५० मिळकत पत्रिकांचा गोंधळ आहे. या मिळकत पत्रिका नव्याने करण्याचे काम चालू आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मिळकत पत्रिका गायब करणारांवर कारवाई..नगर भूमापन विभागातील काही कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक मिळकत पत्रिका गायब केल्या असतील, तर दोषींवर कारवाई करण्यात येईल. यासंबंधीची चौकशी करून गायब मिळकत पत्रिकांवर धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, असेही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सांगली शहरातील मिळकत पत्रिका

  • एकूण मिळकत पत्रिका : ३०,०००
  • गायब मिळकत पत्रिका : ५५०
टॅग्स :Sangliसांगली