शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

तुमचं मूल अचानक तऱ्हेवाईक वागतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 13:02 IST

मुलांचे मूड सातत्यानं स्विंग होत असतील तर या गोष्टी कराच..

ठळक मुद्देमुलांवर आराडाओरड करण्यापेक्षा शांतपणे त्यांच्याजवळ बसा. त्यांना रिलॅक्स, आश्वस्त करा. मुलांचा मूड नक्कीच बदलेल.काही वेळा मुलं लहानसहान गोष्टींनी एकदम भावूक होतात. अशावेळी त्यांना सल्ला देण्याच्या भानगडीत जराही पडू नका.मुलं चिडचिडेपणा करीत असतील, तर त्याचं कारण घरातही असू शकतं.

- मयूर पठाडेमुलांच्या मूडविषयी काय सांगावं? कधी एकदम आनंदात, काय करू आणि काय नको, असं त्यांना झालेलं असतं, तर थोड्याच वेळात मूड असा की एकदम एरंडेल तेल प्याल्यासारखा. घुम्म बसून राहतील.. कधी इतका आक्रस्ताळेपणा की एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. अगदी त्या क्षणाला. ती नाही मिळाली, तर मग आरडाओरडा, रडबोंबल, वस्तूंची फेकाफेक.. अगदी मारामारी करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत.का होतं असं? मुलांचे मूड इतके स्विंग का होतात? का इतक्या झपाट्यानं त्यांचे रंग बदलतात? त्यासाठी काय करायला हवं?काही सोप्या युक्त्या आहेत.पाहा करून. पालक म्हणून या गोष्टी आपल्याला सातत्यानं कराव्या लागतील.

मुलांच्या बदलत्या मूडसाठी काय कराल?१- मुलं अचानक दु:खी मूडमध्ये जातात, कुठे कोपºयात जाऊन बसतात, कोणाशी बोलत नाहीत, काही नाही.. अशावेळी त्यांच्यावर आराडाओरड करण्यापेक्षा शांतपणे त्यांच्याजवळ बसा. त्यांच्याशी बोला. त्यांना रिलॅक्स, आश्वस्त करा आणि त्यांचं म्हणणं समजून घ्या. मुलांचा मूड नक्कीच बदलेल.२- काही वेळा मुलं ओव्हरसेन्सिटिव्ह होतात. लहानसहान गोष्टींनी एकदम भावूक होतात. काही मुलं तर काही ‘कारण नसताना’ अचानक रडायला लागतात, आपल्याला वाटतं, आत्ता तर चांगला होता, अचानक असं काय करायला लागला?.. आपणही मग चिडतो. रागावतो. पण अशावेळी त्याला व्यक्त होऊ नका. सल्ला देण्याच्या भानगडीत तर जराही पडू नका. तो शांत झाल्यावर त्याला विचारा. कुठे काही चुकलं असेल तर गोडीतच आणि समजावून सांगा.३- आजकाल अनेक मुलं आपण पाहतो, त्यांना हवं ते त्याक्षणी त्यांना पाहिजे असतं. नाही मिळालं तर त्यावेळी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. अशा मुलांशी संवाद साधताना जरा जास्त काळजी घ्यावी लागते. घरातही आपण अशाच प्रकारे रिअ‍ॅक्ट होतो का, याचा विचार आधी करायला हवा. तसं जर आपण करीत असू, तर ही सवय आपल्याला पहिल्यांदा बदलायला हवी. मुलांना योग्य तºहेनं आणि साधकबाधक पद्धतीनं विचार करायला शिकवावं लागतं. उशीर लागतो, पण मुलं नक्की शिकतात.४- काही मुलं प्रत्येक वेळी कुठली ना कुठली कारणं पुढे करतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांचं कारण तयार असतं. अभ्यास ना बोअरिंगच आहे, आमचे टिचर ना, त्यांना तर काही शिकवताच येत नाही.. अशा वेळी त्यांना चुकीचं ठरवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा, त्यांच्याशी शाब्दिक वाद घालत बसण्यापेक्षा त्या त्या विषययात, अभ्यासात मुलांची गोडी कशी वाढेल याकडे लक्ष द्यायला हवं. एकदा का अशी गोडी लागली, की मग मुलांची कारणंही बंद होतात.मुलांचे मूड स्विंग होत असतील, तर त्यासाठी पालक म्हणून आपल्यालाही थोडा पेशन्स ठेवावा लागतो. तो ठेवा. मुलांना समजून घ्या. तेही आपल्याला समजून घेतील. शिकतील..