शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कोणत्या शहरातील लोक आपल्या पार्टनरला सगळ्यात जास्त दगा देतात? यादीत आपलं शहर तर नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 14:11 IST

Extra Marital Affairs : या रिपोर्टमध्ये या डेटिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप आणि अॅक्टिविटी कोणत्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जास्त होते याची यादी तयार करण्यात आलीये.

Extra Marital Affairs : शहरांमधील लाइफस्टाईल आणि रिलेशनशिप या दोन गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. शहरांमधील एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सही नेहमी समोर येत असतात. पण अलिकडेच समोर आलेल्या एका डेटिंग अ‍ॅपच्या रिपोर्टने तर शहरी लोकांच्या रिलेशनशिपबाबत एक धक्कादायक बाब समोर आणली आहे. या रिपोर्टनुसार, विवाहित लोकांच्या अफेअरच्या घटना केवळ मोठ्या शहरांमध्येच घडतात असं नाही तर छोट्या शहरांमध्येही वाढत आहेत.

२०२५ मधील या रिपोर्टनुसार विवाहित लोकांसाठी असलेलं डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या यूजर डेटामध्ये भारतातील लोकांचा सहभाग खूप वाढला आहे. या रिपोर्टमध्ये या डेटिंग प्लॅटफॉर्मवर साइन अप आणि अ‍ॅक्टिविटी कोणत्या शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये जास्त होते याची यादी तयार करण्यात आलीये. अशात जाणून घेऊया की, देशातील कोणत्या शहरातील लोक आपल्या पार्टनरला सगळ्यात जास्त धोका देतात.

तामिळनाडूतील शहर सगळ्यात पुढे

रिपोर्टनुसार, कांचीपुरम या यादीत सगळ्यात वरच्या नंबरवर आहे. खास बाब ही आहे की, हे शहर आधी १७व्या स्थानावर होतं, पण एक वर्षाआधी थेट पहिल्या नंबरवर आलं आहे. तसं मंदिरे आणि सिल्क साड्यांसाठी लोकप्रिय हे शहर या यादीमुळे चर्चेत आलंय. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं की, छोटे शहर आणि गावांमध्येही या प्लॅटफॉर्मचा मोठा वापर होत आहे. 

टॉप २० मध्ये दिल्लीतील अनेक भाग

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सेंट्रल दिल्ली दुसऱ्या नंबरवर आहे. त्याशिवाय दिल्लीतील अनेक भागांचा टॉप २० मध्ये समावेश आहे. साउथ वेस्ट दिल्ली, ईस्ट दिल्ली, साउथ दिल्ली, वेस्ट दिल्ली आणि नॉर्थ वेस्ट दिल्ली. दिल्लीशिवाय एनसीआरमधील शहरं गुरूग्राम, नोएडा आणि गाझियाबादही या यादीत आहेत. 

टॉप २० शहरांची यादी

रिपोर्टनुसार भारतात अफेअरसंबंधी ऑनलाईन ट्रेंडच्या आधारावर कांचीपुरम, सेंट्रल दिल्ली,  गुरुग्राम, गौतम बुध नगर, साउथ वेस्ट दिल्ली, देहरादून, ईस्ट दिल्ली, पुणे, बंगळुरू, साउथ दिल्ली, चंडीगढ, लखनौ, कोलकाता, वेस्ट दिल्ली, कामरूप, नॉर्थ वेस्ट दिल्ली, रायगढ़, हैदराबाद, गाजियाबाद आणि जयपुर यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मुंबईचा नाव नाही. 

का वाढताहेत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर?

तज्ज्ञांच्या मते, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. कामाचे लांब तास, नात्यातील भावनिक दुरावा, वैयक्तिक आयुष्यात वाढलेले स्वातंत्र्य आणि मोठ्या शहरांमध्ये मिळणारी गुप्तता हे घटक या ट्रेंडला चालना देतात. याशिवाय, ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे लोकांना प्रायव्हसीमध्ये नवीन नाती जोडणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे.

एका सर्वेक्षणानुसार, भारत आणि ब्राझीलमध्ये सर्वाधिक लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अफेअर झाल्याचे मान्य केले आहे. या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या सुमारे 53 टक्के भारतीयांनी कबूल केले की त्यांचे कधीतरी एक्स्ट्रा मॅरिटल रिलेशनशिप झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Which Indian cities have the most cheating partners? Find out here!

Web Summary : Kanchipuram tops the list of Indian cities where people are most likely to cheat on their partners, according to a dating app report. Delhi and other NCR cities also feature prominently. Experts cite long hours, emotional distance, and online platforms as contributing factors.
टॅग्स :relationshipरिलेशनशिपSocial Viralसोशल व्हायरल