शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
4
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
5
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
6
 सोनिया दुहनबाबत विचारताच जितेंद्र आव्हाडांनी जोडले हात, म्हणाले, "त्या काय…’’ 
7
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
8
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
9
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
10
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
11
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
12
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
13
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
14
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
15
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
16
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
17
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
18
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
20
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

OMG : ‘या’ कारणाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केले नाही लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 12:35 PM

आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना भुरळ घालणाऱ्या लताजींनी लग्न का नाही केले? असे कोणते कारण आहे ज्यामुळे त्यांनी संसार थाटला नाही? जाणून घ्या !

देशाची गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाचे करोडो लोक चाहते आहेत. त्यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे. विशेषत: त्यांच्या बाबतीत चर्चा करताना प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येत असेल की, आपल्या आवाजाच्या जादूने सर्वांना भुरळ घालणाऱ्या लताजींनी लग्न का नाही केले? असे कोणते कारण आहे ज्यामुळे त्यांनी संसार थाटला नाही?  लताजींना एकदा एका मुलाखतीत याविषयी प्रश्नही विचारण्यात आला होता आणि त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, परिवार आणि लहान भाऊ-बहिणींच्या जबाबदारीमुळे त्यांना कधी याविषयी विचार करायला वेळच मिळाला नाही. ही गोष्ट तर सर्वच जाणतात, मात्र यामागे अजून वेगळे कारणही होते ज्याविषयी बऱ्याचजणांना कल्पनाही नाही.   * पहिले प्रेम  लता मंगेशकर यांना आपल्या भावाच्या मित्रासोबत प्रेम झाले होते ज्यांचे नाव राज सिंह होते आणि ते डूंगरपुर राजघराण्याचे महाराजा होते. लताजींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी मुंबईला आले. त्याठिकाणी ते लताजींच्या घरीदेखील यायचे आणि त्यांच्या भावासोबत क्रि केटदेखील खेळायचे. लताजींनादेखील क्रिकेट खूप आवडायचे. यादरम्यानच दोघे एकमेकांना आवडू लागले. त्यावेळी लताजी देखील हिंदी चित्रपटातून प्रसिद्धीस आल्या होत्या. याविषयी मात्र लताजींनी कधीही चर्चा केली नाही मात्र त्यावेळी मीडियाद्वारे या दोघांच्या नावाच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या.   * या कारणाने नाही केले लग्न दोघेही एकमेकांना पसंत करु लागले होते आणि लग्नदेखील करु इच्छित होते मात्र राज सिंह यांनी परिवाराला वचन दिले होते की, ते साधारण कुटुंबाच्या घरच्या मुलीशी लग्न करणार नाहीत. या कारणाने दोघांचे लग्न नाही झाले. त्यानंतर मात्र लताजींनी संपूर्ण आयुष्य अविवाहित राहण्याचे ठरविले आणि विशेष म्हणजे राज सिंह यांनीही लग्न केले नाही.    लता मंगेशकर भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.source : nari.punjabkesari.com