शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:15 IST

Accident Ratnagiri Highway- मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडच्या बाजूने येणारा मालवाहू टेम्पो कलंडून झालेल्या अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. बन्सीकुमार छुनीलाल कुमावत (वय ५०, रा. पनवेल) असे मृत कामगाराचे नाव असून, गाडीतील टाईल्सचे खोके अंगावर पडून त्याचा दुर्दैव्यारित्या मृत्यू झाला. हा अपघात कशेडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडला.

ठळक मुद्देमालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठारगाडीतील खोके अंगावर पडल्याने मृत्यू

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडच्या बाजूने येणारा मालवाहू टेम्पो कलंडून झालेल्या अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. बन्सीकुमार छुनीलाल कुमावत (वय ५०, रा. पनवेल) असे मृत कामगाराचे नाव असून, गाडीतील टाईल्सचे खोके अंगावर पडून त्याचा दुर्दैव्यारित्या मृत्यू झाला. हा अपघात कशेडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडला.कशेडी वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक उपनिरीक्षक बोडकर यांनी या अपघाताबद्दल अधिकृत माहिती दिली. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चालक सुधाकर मोतीराम हगनुरे (वय २७, रा. पनवेल) हा आयशर टेम्पो (एमएच ०४, डीएस २३१७)मधून टाईल्सचे खोके घेऊन पनवेल ते गुहागर असा जात होता. टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यावर उजव्या बाजूला पलटी होऊन अपघात घडला. टेम्पोमध्ये टाईल्सचे खोके मोठ्या प्रमाणात होते. या टाईल्सच्या खोक्यांखाली गाडीमध्ये बसलेला कामगार बन्सीकुमार छुनीलाल कुमावत चिरडला. तसेच या टेम्पोतील दुसरा कामगार मुकेश कुमावत (वय ४०, रा. पनवेल) याला दुखापत झाली आहे. त्याला तत्काळ कळंबणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.मुकेशची प्रकृतीही गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या सहाय्याने रस्त्याबाहेर काढण्यात आला. तोपर्यंत वाहतुकीवर परिणाम झाला होता. कशेडी पोलिसांनी आधी एक बाजू मोकळी करून वाहनांचा मार्ग खुला करून दिला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी