On the way, to Tambi and Borgaon | चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण मार्गताम्हाणे, तांबी व बोरगांव येथे पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई

चिपळूण : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारू धंद्यांवर छापा टाकला असून, चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, रावळगाव, बोरगांव या गावात दारूच्या हातभट्ट्यांवर छापा घातला.

तेथील १० हजार लिटर कच्चे रसायन व तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणात एक तीनचाकी रिक्षासह पावणेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघाना अटक करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध दारूधंद्यांवर छाप्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. यामुळे दारूधंदे करणाऱ्या व्यक्तींना जरब बसली आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली निरीक्षक शंकर जाधव, शरद जाधव, सुरेश पाटील, दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, किरण पाटील, विशाल सकपाळ, राजेंद्र भालेकर आदींच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 


Web Title: On the way, to Tambi and Borgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.