शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना दीड हजार रुपयांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने राज्यात १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात निराधार, रिक्षा व्यावसायिक यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने दीड हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र, अजूनपर्यंत या रिक्षा व्यावसायिकांना हा लाभ मिळालेला नाही. अनेकांनी शासनाचे पोर्टलच अद्याप सुरू होत नसल्याची अडचण सांगितली, तर काहींचे परवाने अद्याप ऑनलाईन झाले नसल्याने त्यांना लाभ मिळताना अडचण निर्माण झाली आहे.

लाॅकडाऊन सुरू झाल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या व्यवसायावर गेल्यावर्षीप्रमाणे पुन्हा प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून दीड हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी पाेर्टल विकसित करून त्याद्वारे थेट त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात काही रिक्षा व्यावसायिक परवानाधारक असले तरी, त्यांची नोंदणी ऑनलाईन झाली नसल्याने त्यांची पोर्टलवर नोंद होत नाही. तसेच काहींच्यामते पोर्टलच सुरू नसल्याने अद्याप या मदतीची प्रतीक्षाच आहे.

शासनाने रिक्षा व्यावसायिकांना लाॅकडाऊनच्या काळात आर्थिक मदत देण्यासाठी १५०० रुपयांची मदत देऊ केली आहे. मात्र, गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही या मदतीची प्रतीक्षाच करीत आहोत. शासनाने यासाठी पोर्टल सुरू केले आहे. मात्र, बरेचदा हे पोर्टल सुरूच नसते. तसेच काहींना यावर माहिती भरताही येत नसल्याने अनेकांना मदत मिळताना अडचणी येत असून ते आर्थिक मदतीपासून वंचित आहेत.

- प्रमोद वायंगणकर, रत्नागिरी

शासनाने रिक्षा व्यावसायिकांना १५०० रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. परंतु अजून तरी हे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. सध्या लाॅकडाऊनमुळे आमचा व्यवसाय थांबला आहे. प्रवासीच नसल्याने व्यवसाय कसा होणार? त्यामुळे शासनाने आम्हाला वेळेवर मदत केली तर सध्या आमची होत असलेली उपासमार टळेल. सध्या आम्ही शासनाच्या मदतीची वाट बघत आहोत.

- प्रशांत मुळ्ये, कोळंबे, ता. संगमेश्वर

काही परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना शासनाची दीड हजार रुपयांची मदत मिळाली आहे. मात्र, काहींनी परवाने अजूनही ऑनलाईन केलेले नसल्याने परवानाधारक म्हणून त्यांची नोंद झाली नसल्याने अशांंना शासनाची ही मदत मिळताना अडचण येऊ शकते. काही ठिकाणी पोर्टलचीही समस्या येत आहे.

- अविनाश कदम, उपजिल्हा अध्यक्ष, शिवसेना प्रणित रिक्षा व्यावसायिक संघटना, रत्नागिरी

परवानाधारक रिक्षा व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या मानधनाचा विषय जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यासाठी परवानाधारक रिक्षाचालकांना शासनाच्या पोर्टलवर त्यांचे नाव, परवाना क्रमांक, आधार क्रमांक, बॅंक खाते नमूद करावे लागते. त्यानंतर त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात.

- दत्ता भडकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी