शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे हापूसवर तुडतुड्याचा धोका

By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST

किडीच्याही प्रादुर्भावाची शक्यता : फवारणीच्या खर्चाने बागायतदार चिंतेत

रत्नागिरी : सध्या हवेत मोठ्या प्रमाणात गारठा असून, तापमान १७ अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे. परंतु गेले दोन दिवस ढगाळ वातावरण असल्यामुळे आंब्याच्या मोहोरावर तुडतुडा व किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला असून, फवारणी खर्च वाढला आहे.हवामानात वारंवार होणाऱ्या बदलाने नवीन वर्षातच हापूसच्या धोक्याची घंटा वाजली आहे. हापूसला मोहोर लागण्यापूर्वीच तक्रारी सुरु होत असल्याने हापूसचे पीक यंदाही कमी येणार की काय? अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे. वारंवार होणाऱ्या या बदलामुळे आंबा बागायतदार मात्र चिंतेत सापडला अहे.उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील अन्य जिल्ह्यासह रत्नागिरीचा पारा घसरला आहे. किमान १७ अंश सेल्सिअस, तर कमाल २९ अंश सेल्सिअस तापमान आहे. दिवसादेखील थंड वारे वाहात असल्यामुळे लहान-थोर मंडळी थंडीने गारठली आहेत. यावर्षी मुळातच थंडी उशिरा सुरू झाल्याने आंब्याची मोहोर प्रक्रिया उशिरा सुरू झाली. अद्याप मोहोर प्रक्रिया सुरू आहे.बहुतांश झाडांना फळधारणा झाली आहे. वाटाणा व सुपारीएवढी फळधारणा झाली आहे. १५ अंश सेल्सिअस इतके तापमान पोषक आहे. परंतु १५ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान नीचांक आले तर मात्र पुनर्माेहोराचा धोका वाढू शकतो. शिवाय फळधारणा थांबण्याबरोबर वाढीचा वेग मंदावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, कल्टार घातलेल्या झाडांना पुनर्माेहोर सुरू होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे हापूसवर त्याचा परिणाम होण्याचीही शक्यता बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.वातावरण ढगाळ असल्यामुळे मोहोरावर तुडतुडा, कीडसदृश रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कीड नियंत्रणासाठी मोहोर व फळधारणेच्या संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची फवारणी करण्याची आवश्यकता आहे. मात्र, त्यासाठी आता वाढीव खर्चाची तरतूद करावी लागणार असल्याने बागायतदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)