शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक कार्य ही आमची प्रेरणा : भुस्कुटे

By admin | Updated: October 10, 2014 23:03 IST

ज्येष्ठांसाठी सहल : दुर्गाशक्ती प्रतिष्ठानने राबवला अनोखा उपक्रम

चिपळूण : ज्येष्ठांना आपल्या समन्वयक मित्र - मैत्रिणींसमोर एक दिवस घालविण्याचा आनंद मिळावा म्हणून सहल आयोजित केली जाते. या ज्येष्ठांमध्ये माझे आई-वडील, सासू-सासरे बघते. त्यांच्या सहवासात मी करीत असलेल्या सामाजिक कार्याची प्रेरणा व आशीर्वाद मिळतात, असे मत दुर्गाशक्तीच्या अध्यक्ष अश्विनी भुस्कुटे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दुर्गाशक्तीतर्फे चिपळुणातील ज्येष्ठांची एकदिवसीय सहल नाणिजधाम येथे नेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या सभेमध्ये ४० ज्येष्ठांनी सहभाग नोंदविला. यावेळी दुर्गाशक्तीच्या सचिव सेजल कारेकर, खजिनदार साक्षी कोलगे, सदस्या सुनीता कारेकर, रमेश आवटी आदी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक भुस्कुटे, हेमंत भोसले व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. नाणिजधाम येथील परिसर पाहून ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले. आपण समाजासाठी काही तरी केले पाहिजे, ही भावना लक्षात ठेवून सामाजिक भावनेतून हा ज्येष्ठांसाठी उपक्रम राबविण्यात आला, असे भुस्कुटे यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचे क्षण यावेत, यासाठी सहलीच्या माध्यमातून वेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे व त्यातून ज्येष्ठांना ्आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्गाशक्तीच्या माध्यमातून अशा उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चिपळूण तालुक्यात भुस्कुटे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या चालण्याच्या स्पर्धा, सहल, आरोग्यविषयक शिबिर, वैद्यकीय तपासणी असे विविध उपक्रम राबविले. या सर्वांनाच ज्येष्ठांकडून मोठा प्रतिसाद लाभला आहे. आता एक दिवसाच्या सहलीतून अशा ज्येष्ठांसाठी दुर्गाशक्ती गेली काही वर्षे प्रयत्न करीत आहे. या विषयात काही नवीन करण्याबाबत ज्येष्ठांशी संपर्क साधत आहोत, असे त्यांनी सांगितले. विविध विषयांवर मार्गदर्शन देण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या. आरोग्य, आहार व अन्य गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)